हैदराबाद - तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. त्याचे आत्महत्येचे कारण येकून हैराण होण्याची स्थिती आहे. मोहम्मद साबीर आसे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला पत्नीने भाकरी देण्यास नकार दिल्यामुळेच त्याने आत्महत्या केली अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सर्कल इन्स्पेक्टर विनायक रेड्डी यांनी सांगितले की, मोहम्मद साबीर (३०) हा बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील रहिवासी होता आणि संगारेड्डी जिल्ह्यात मजूर म्हणून काम करत होता. सोमवारी रात्री काम आटोपून घरी आल्यावर त्याने पत्नीला रोट्या बनवण्यास सांगितले, त्याला पत्नीने तिने नकार दिला. हा अपमान समजून साबीरने रात्री उशिरा गळफास लावून घेतला.