तिरुअनंतपुरम (केरळ) - पत्नीला कामावर जाणे पसंत नसलेल्या पतीने तिच्यावर निर्दयीपणे मारहाण करून मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
पतीने पत्नीला केली बेदम मारहाण, व्हिडिओ टाकला सोशल मीडियावर; पोलिसांकडून अटक - पतीने पत्नीला मारहाण केल्याचा व्हिडिओ टाकला
पत्नीला कामावर जाणे पसंत नसलेल्या पतीने तिच्यावर निर्दयीपणे मारहाण करून मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
![पतीने पत्नीला केली बेदम मारहाण, व्हिडिओ टाकला सोशल मीडियावर; पोलिसांकडून अटक फोटो](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16684228-thumbnail-3x2-keral.jpg)
फोटो
व्हिडिओ
दोन दिवसांपूर्वी तिरुवनंतपुरमजवळील मलयंकीझू येथे ही घटना घडली होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपी दिलीप दारूच्या नशेत घरी आला आणि व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करत असताना त्याने पत्नीला मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची चौकशी केली. त्यानंतर पत्नीने दिलीपविरोधात तक्रार दिली. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नासह इतर कलमांखालीही आरोप ठेवण्यात आले.