नवी दिल्ली -आग्नेय बंगालच्या उपसागरातून उठलेले 'असानी' चक्रीवादळ येत्या २४ तासांत ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा आणि आंध्र प्रदेशसह झारखंड, बिहार, बंगाल, छत्तीसगड आणि इतर राज्यांमध्ये राहील. ( Asani hit the coast of Odisha in 24 hours ) या दरम्यान अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असही त्यांनी म्हटले आहे. ओडिशाचे आयुक्त पीके जेना म्हणाले की, 'असानी' चक्रीवादळ सध्या दक्षिण पूर्व अंदमानमध्ये आहे, जे उत्तर पश्चिम दिशेने सरकत आहे. ( South 24 Pargana ) 10 मे पर्यंत त्याच दिशेने वाटचाल अपेक्षित आहे. नंतर, ते पूर्णपणे ओडिशाच्या समांतर पुढे जाईल. 11 मे रोजी संध्याकाळी पुरीच्या दक्षिणेस ते पोहोचेल असही ते म्हणाले आहेत.
असानी नाव का दिले - यावेळी श्रीलंकेने या चक्रीवादळाला 'असानी' असे नाव दिले आहे. असनी म्हणजे स्थानिक भाषेत राग. हिंद महासागर क्षेत्रात भारताच्या पुढाकाराने 2004 पासून आठ देशांनी वादळांना नाव देण्याची पद्धत सुरू केली. या देशांमध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. ( Asani cyclone Odisha coast ) चक्रीवादळांची नावे परस्पर संमतीने आणि करारानुसार ठेवली जातात. इंग्रजी वर्णमालेनुसार, सदस्य देशांच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसार त्यांचा क्रम ठरवला जातो. सर्व देश चक्रीवादळांची नावे आधीच ठरवतात आणि संयुक्त राष्ट्रांच्या 'WMO' संस्थेला पाठवतात. वादळाचा वेग पाहता देशांनी दिलेल्या नावांपैकी एक नाव त्या वादळाला देण्यात आले आहे.
आग्नेयेकडे 580 किमी अंतरावर - हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी म्हटले आहे की, चक्रीवादळ आसनी गेल्या 6 तासांपासून 25 किमी प्रतितास वेगाने पश्चिम-उत्तर दिशेने सरकत आहे. ( South 24 Parganas ) चक्रीवादळ आसनी पुरीपासून 680 किमी दक्षिण-दक्षिण आणि विशाखापट्टणमपासून आग्नेयेकडे 580 किमी अंतरावर आहे. पुढील ४ तासांत ते काही प्रमाणात सौम्य होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हलका पाऊस पडेल - मंगळवार संध्याकाळपर्यंत, आसनी चक्रीवादळ उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाजवळील समुद्रात पोहोचेल. परंतु, तेथून ते ईशान्य दिशेने सरकेल. ओडिशातील भागाशी जमीन टक्कर देणार नाही. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर दोन दिवस जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, अशा स्थितीत सर्व बंदरांवर धोक्याचा क्रमांक देण्यात आला आहे. त्याच्या प्रभावामुळे सोमवारपासून ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहील, मंगळवारी संध्याकाळी हलका पाऊस पडेल आसाही अंदाज आहे.
समुद्रात न जाण्याचा सल्ला - हे चक्रीवादळ ओडिशाच्या जमिनीवर धडकणार नाही, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, चक्रीवादळाच्या प्रभावाची भीती लक्षात घेता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याच वेळी, 10, 11 आणि 12 मे रोजी किनारपट्टी ओडिशात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता, सर्व बंदरांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, मच्छिमारांना 9 ते 11 मे या कालावधीत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
60 किलोमीटर वेगाने वारे - हवामान तज्ज्ञांच्या मते, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 9 मे पासून ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहील. त्याच वेळी, 10 मे रोजी संध्याकाळी हलका पाऊस पडेल. मात्र, या काळात ओडिशातील गजपती, गंजम आणि पुरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 11 मे रोजी गंजम, खुर्दा, पुरी, जगतसिंगपूर आणि कटक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. त्याचप्रमाणे 12 मे रोजी पुरी, जगतसिंगपूर, कटक, केंद्रपारा, भद्रक, बालेश्वर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. यादरम्यान ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.