महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Strike in Jail : पत्नीला भेटू द्या; तुरुंगात पतीचे 50 दिवसांपासून उपोषण सुरू - पत्नीला भेटण्यासाठी तुरुंगात पतीचे उपोषण

200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले सुकेश चंद्रशेखर पत्नी लीना पॉलला भेटण्यासाठी 50 दिवसांपासून उपोषणाला बसले (Strike in Jail to Meet Wife) आहेत. ते दर आठवड्याला पत्नी लीना मारिया पॉलला भेटण्याची मागणी करत आहेत.

Strike in Jail
पत्नीला भेटण्यासाठी तुरुंगात पतीचे उपोषण

By

Published : Jun 11, 2022, 10:18 PM IST

नवी दिल्ली :200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले सुकेश चंद्रशेखर पत्नी लीना पॉलला भेटण्यासाठी 50 दिवसांपासून उपोषणाला बसले (Strike in Jail to Meet Wife) आहेत. ते दर आठवड्याला पत्नी लीना मारिया पॉलला भेटण्याची मागणी करत आहेत. ही मागणी बेकायदेशीर ठरवताना कारागृह प्रशासनाने न्यायालयाला याबाबत माहिती दिली आहे. उपोषणामुळे सुकेश अशक्त झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा -Ram lala in Ayodha : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामल्ला मूर्तीची जानेवारी २०२४ होणार प्रतिष्ठापना

पत्नीला भेटण्याच्या मागणीसाठी पतीचे तुरुंगातच उपोषण - मिळालेल्या माहितीनुसार, फोर्टिसचे माजी प्रवर्तक शिवेंद्र सिंह यांची पत्नी अदिती सिंह यांची सुकेश चंद्रशेखर यांनी सुमारे 200 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्यामुळे त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या अटकेनंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून त्यांना तिहार तुरुंग क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, अलीकडेच त्यांना तेथून तुरुंग क्रमांक 3 मध्ये हलवण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांना साथ देणारी त्यांची पत्नी लीना पॉल ही तुरुंग क्रमांक 6 मध्ये आहे.

काय आहे प्रकरण - तिहार तुरुंगाचे डीजी संदीप गोयल यांनी सांगितले की, सुकेश चंद्रशेखर २३ एप्रिलपासून उपोषणावर आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंत दोन-तीन वेळाचे ते जेवले आहेत. तुरुंगात असलेल्या कैद्यांची पत्नी जर तुरुंगातच असेल तर त्यांची 15 दिवसांतून एकदा भेटण्याच संधी मिळते. लीनाही तुरुंग क्रमांक 6 मध्ये आहे. यामुळे त्यांची सुकेश चंद्रशेखरशी दर महिन्याला दोनदा भेट होते. पण, सुकेशने दर आठवड्याला पत्नी लीनाला भेटू देण्याची मागणी केली. हे तुरुंगाच्या नियमांच्या विरोधात असून त्यांची मागणी मान्य करता येणार नाही. त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या उपोषणाची माहितीही न्यायालयाला देण्यात आली आहे, असे डीजी संदीप गोयल यांनी सांगितले.

हेही वाचा -Child Died : लुडो खेळतो म्हणून मुलाला केली पित्याने बेदम मारहाण; मुलाचा मृत्यू, पत्नीला दिली धमकी

ABOUT THE AUTHOR

...view details