नई दिल्ली : राजधानी दिल्लीतील बुरारी मैदानावर आज देशातील सर्वात मोठा मानवी तिरंगा बनवण्याचा कार्यक्रम होता, तो पुढे ढकलण्यात आला आहे. दुपारी बाराच्या सुमारास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालहेही ( Chief Minister Arvind Kejriwal ) या कार्यक्रमाला पोहोचणार होते. त्यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांकडून मानवी तिरंगा ( human tricolor ) साकारला जाणार होता. जो देशातील सर्वात मोठा मानवी तिरंगा ठरला असता. बुरारी मैदानावर ( Burari Maidan Delhi ) 52 हजार शाळकरी मुले मानवी तिरंगा बनवणार होते. मात्र, पावसाचे पाणी संपूर्ण मैदानात भरल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून दिली.
दिल्लीत जोरदार पाऊस - बुरारी मैदानात पावसाचे पाणी तुंबल्याने हा कार्यक्रम काही काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. काल रिहर्सल होणार होती, त्यादरम्यान जोरदार पाऊस झाला. कालची रिहर्सलही पावसामुळे रद्द करावी लागली. बुरारी मैदानावर पोहोचलेल्या शाळकरी मुलांना बसमध्ये बसवून शाळेत पाठवण्यात आले.