कानपूर(उत्तर प्रदेश) :कानपूर आयुक्तालयाच्या नौबस्ता पोलिस स्टेशनच्या हद्दीत मानवी तस्करीचे प्रकरण (Human Trafficking Case) समोर आले आहे. कानपूरच्या नौबस्ता रवींद्र नगरमध्ये ६ महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या सुरेश मांझी (३०) याला त्याच्या ओळखीच्या विजय याने मचारिया पिंक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या झकरकाटी पुलाखाली आधी ओलीस ठेवले आणि नंतर बेदम मारहाण केली. त्याच्या हाताचे व पायांचे पंजे तोडले. डोळ्यात रसायन टाकून आंधळे केले. त्यानंतर आरोपी विजयने सुरेशला राज नावाच्या तरुणाला 70 हजार रुपयांना विकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Kanpur Man Sold to Beggar Gang) आला आहे.
Man Sold to Beggar Gang : नोकरीचे आमिष दाखवत तोडले डोळे अन् हातापायाचे पंजे - तरुणाला मारहाण करून भीक मागायला लावले
कानपूर आयुक्तालयाच्या नौबस्ता पोलिस स्टेशनच्या हद्दीत मानवी तस्करीचे प्रकरण (Human Trafficking Case) समोर आले आहे. कानपूरच्या नौबस्ता रवींद्र नगरमध्ये ६ महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या सुरेश मांझी (३०) याला त्याच्या ओळखीच्या विजय याने मचारिया पिंक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या झकरकाटी पुलाखाली आधी ओलीस ठेवले आणि नंतर बेदम मारहाण केली. त्याच्या हाताचे व पायांचे पंजे तोडले. डोळ्यात रसायन टाकून आंधळे केले.
![Man Sold to Beggar Gang : नोकरीचे आमिष दाखवत तोडले डोळे अन् हातापायाचे पंजे human trafficking](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16835081-thumbnail-3x2-humant.jpg)
भीक मागायला लावायचे - मिळालेल्या माहितीनुसार, राज नावाचा तरुण हा दिल्लीत अशा लोकांना भीक मागायला लावतो. सुरेशसोबतही तो असेच करणार होता, मात्र, राजने सुरेशला अनेक ठिकाणी अॅसिड टाकून जाळले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याला जखमा पसरू लागल्या होत्या. सुरेश मांझी यांची प्रकृती पाहून त्यांनी त्यांना उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले होते. सुरेशच्या उपचारासाठी डॉक्टरांनी 37 हजार रुपये खर्च केले आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू -गुरुवारी या घटनेची माहिती नगरसेवक प्रशांत शुक्ला यांना कळताच त्यांनी कुटुंबीयांसोबत नौबस्ता पोलीस ठाण्यात तक्रार केली. एसीपी गोविंद नगर विकास कुमार पांडे यांनी सांगितले की, या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून पुढील कारवाई केली जात आहे.