अनेकदा आपण आपले पैसे गुंतवणुक करण्यासाठी योग्य पर्याय शोधत असतो. (PPF) पीपीएफ खाते काढुन, त्यात गुंतवणुक करणे म्हणजे ही एक सुरक्षित गुंतवणुक ठरु शकते. खाते उघडल्यानंतर 15 वर्षांनी मॅच्युरिटी झाल्यावर, (PPF) पीपीएफ खातेदार, पीपीएफ खातेखात्यातून पैसे काढू How to withdraw PPF money from bank account शकतात. मॅच्युरिटीवर पीपीएफ खात्यातून संपूर्ण निधी काढता येतो. खाते उघडण्याच्या सातव्या वर्षापासून पीपीएफ खातेधारकाला काही पैसे काढण्याचा पर्याय देखील यामध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात फक्त एकदा ठरवुन दिलेल्या मुदतीप्रमाणे पैसे काढण्याची परवानगी असते. काही ठोस कारणास्तव पाच वर्षानंतर, पीपीएफ खाती अकाली बंद करण्याची देखील परवानगी आहे.
फॉर्म C मध्ये आहेत तीन विभाग :जर तुम्हाला पीपीएफ खात्यातून अंशत: किंवा पूर्ण पैसे काढायचे असतील, तर तुम्हाला पीपीएफ खाते उघडलेल्या बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेत फॉर्म सी सबमिट करणे आवश्यक आहे. बँकेतील तुमच्या पीपीएफ खात्यातून पैसे कसे काढायचे ? ते पुढे टप्प्या टप्प्याने सांगितले आहे. तुम्ही बँकेच्या वेबसाइटवरून पीपीएफ काढण्याचा फॉर्म किंवा फॉर्म C डाउनलोड करू शकता. ते तुमच्या बँकेच्या शाखेतूनही गोळा केले जाऊ शकते. फॉर्म C मध्ये तीन विभाग आहेत.
फॉर्मचा पहिला भाग म्हणजे घोषणा विभाग : या विभागात, तुम्हाला तुमचा पीपीएफ खाते क्रमांक आणि तुम्हाला खात्यातून काढायची असलेली रक्कम द्यावी लागेल. त्याशिवाय, खाते किती वर्षांपासून सक्रिय आहे, हे देखील नमूद करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अल्पवयीन व्यक्तीच्या पीपीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील, तर त्याचे नाव फॉर्ममध्ये नमूद केले पाहिजे.
कार्यालय-वापर विभाग:फॉर्मचा दुसरा भाग अधिकृत वापरासाठी आहे. या भागात खालील गोष्टींचा समावेश आहे