नवी दिल्ली :हिवाळा आला आहे आणि तापमानात दररोज घट होत आहे. त्यातच लोकांना हाडे आणि सांधेदुखीचे दुखणे सहन करणे कठीण होत आहे. हिवाळ्यात सांधेदुखी ही एक किंवा अधिक सांध्यांमध्ये वाढलेल्या जळजळमुळे होते. शरीरातील जॉईंट असलेल्या भागांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी होत असल्यामुळे सांधे कडक होतात, त्यामुळे सांधे आणि हाडे दुखतात.
संधिवाताचा त्रास अधिक : सांधेदुखी हिवाळ्याच्या ऋतुमध्ये त्रास देते. ज्यामुळे विशेषतः संधिवात असलेल्या रुग्णांचे जीवन कठीण होते. यामध्ये जर का रुग्णांनी योग्य ती काळजी घेतली नाही तर, त्या दुखण्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होतो. शिवाय याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होतो. सांध्यांमध्ये होणाऱ्या प्रचंड वेदना टाळण्यासाठी आपण काही उपाय करु शकतो.
व्हिटॅमिन डी कमतरता : हिवाळ्याच्या हंगामात सांधेदुखीचा सामान्य प्रकार आहे. कारण थंड हवामानामुळे बोटे आणि पायाचे रक्त भिसरण होणे कमी होऊ शकते, ज्यामुळे सांधेदुखी वाढू शकते. कमी तापमानात स्नायू देखील आकुंचण पावतात, स्नायूंना परिणामी कडकपणा आणि वेदना होतात. याशिवाय, लोक हिवाळ्यात घरामध्येच थांबतात, ज्यामुळे शरीराला सूर्यप्रकाश मर्यादित मिळतो आणि परिणामी 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता होऊ शकते.