नवी दिल्ली :इलॉन मस्क ट्विटरचे प्रमुख बनल्यानंतर ट्विटरमध्ये मोठे बदल होत ( Elon Musk Twitter Chief ) आहेत. आता ट्विटरवर 'ब्लू टिक' हवी असल्यास पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटरवरून अनेक बड्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर ( dismissed employees ) इलॉन मस्क आता नवेनवे उपाय निर्णय घेत आहेत. इलॉन मस्क यांनी उर्वरित ट्विटर कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम देत पेड व्हेरिफिकेशनची ( Twitter Paid Verification ) अंतिम मुदत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इलॉन मस्क यांचे म्हणणे आहे की, जर अधिकाऱ्यांनी त्यांची मुदत पूर्ण केली नाही तर त्यांनाही कामावरून काढून टाकले जाईल.
Twitter : तुम्हाला मिळू शकते ब्ल्यू टिक, ट्विटर आणणार 'ही' योजना - ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन
इलॉन मस्क ट्विटरचे प्रमुख बनल्यानंतर ट्विटरमध्ये मोठे बदल होत ( Elon Musk Twitter Chief ) आहेत. आता ट्विटरवर 'ब्लू टिक' हवी असल्यास पैसे मोजावे लागणार आहेत. तेही प्रति महिना 1,647 रूपये.
महिन्याला 1,647 आकारणार : ट्विटर अधिकार्यांच्या मते, कंपनी सध्या नवीन ब्लू सबस्क्रिप्शनसाठी प्रति महिना 1,647 रूपये आकारणार आहे. त्याशिवाय, 90 दिवसांच्या आत सबस्क्रिप्शन मॉडेलवर यावे लागेल. अन्यथा त्यांचे ब्लू टिक( Blue Subscription) काढून टाकले जाईल. हे काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ब्लू टिकसाठी 1,647 रूपये आकारण्याचा नियम भारतासारख्या देशांमध्ये लागू करण्यात आला असला तरी, याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी शुल्क आकारण्याचा विचार करत ( Twitter Blue Tick ) आहे.
ब्लू सबस्क्रिप्शन सेवा वर्षभरापूर्वी सुरू : ट्विटरने ब्लू सब्सक्रिप्शन सुमारे एक वर्षभरापूर्वी लॉन्च केले होते. याला ट्विटरची प्रीमियम सेवा म्हणतात. या सेवेमध्ये, वापरकर्त्यांना काही अतिरिक्त वैशिष्ट्ये ऑफर करण्यात आली आहेत. जी सामान्य ट्विटर वापरकर्त्यांसाठी लॉक केलेली आहेत. यामध्ये विविध होम कलर स्क्रीन आयकॉन्सचाही समावेश आहे. खरं तर, ट्विटरला ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन आणि पेड व्हेरिफिकेशनद्वारे आपला महसूल वाढवायचा आहे. इलॉन मस्क बऱ्याच काळापासून ट्विटर विकत घेण्याच्या महत्त्वाकांक्षेत होते.