आई-वडिलांनी (Parents) कितीही प्रयत्न केला तरी लहान मुलं (Children) सहजपणे चुकीच्या सवयींच्या (bad habits) जाळ्यात अडकतात. पुरेशी माहिती नसल्यामुळे लहानपणी मुलं, पालकांनी आपलं म्हणणं ऐकावं यासाठी त्यांच्याशी किंवा मोठ्या माणसांशी बरेच वेळा वाद (arguments) घालू लागतात. अशा वेळी आई-वडील त्यांना रागावून वेळीच त्यांच्या चुकीची जाणीव करून देतात. मात्र तुमच्या ओरड्यामुळे किंवा मारामुळे मुलं तुमचं सगळंच ऐकायला लागतील आणि वाद घालणं सोडतील, असं दरवेळेस होणं शक्य नाही. कधीकधी मुलं आक्रमक (aggressive) होऊन अजून वाद घालणं सुरू करतात. अशा वेळी काय करायचं हे पालकांना कळत नाही. मुलांना कसे करावे, त्यांची समजूत कशी (How to deal with childrens) घालावी, (parenting tips) याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. Parenting News
घरात जास्त कडक धोरणे नकोत :तुमच्या मुलांना वाद घालण्याची सवय लागलीअसेल, तर त्याच्याशी जास्त कठोरपणे वागू नका. अशा वेळी तुमचा ओरडा ऐकून किंवा मार खाऊन मुले आणखी हट्टी स्वभावाची होऊ लागतात. त्याचबरोबर त्यांना मारलं तर हळूहळू मुलांच्या मनात पालकांबद्दल असलेली भीतीही संपते. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना जास्त कडक धोरण ठेवू नये.