महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

No Claim Bonus Benefits : नो क्लेम बोनस नवीन वाहन विम्यासाठी ठरते फायदेशीर, कसे ते जाणून घेऊया - पॉलिसी

जर तुम्ही वर्षातून एकदाही विमा क्लेमचा दावा केला नसेल; तर पुढील पॉलिसी घेताना विमा कंपनी तुम्हाला त्यात सूट देते. त्यामुळे तुम्हाला पुढील विमा पॉलिसीसाठी कमी किंमत मोजावी लागेल. याला 'नो क्लेम बोनस' म्हणतात. या अहवालात जाणून घ्या, 'नो क्लेम बोनस' नवीन वाहन विम्यामध्ये प्रीमियमचे दडपण कसे कमी करतो ते.

No Claim Bonus Benefits
नो क्लेम बोनस

By

Published : Jan 28, 2023, 5:51 PM IST

हैदराबाद : सुरक्षित ड्रायव्हिंग सुनिश्चित करण्यासाठी विमा कंपन्या वाहन मालकांना 'नो क्लेम बोनस' (NCB) ऑफर करतात. जेव्हा लोक त्यांच्या जुन्या वाहनाची नवीन बदली करतात, तेव्हा बरेच लोक हा नो क्लेम बोनस (NCB) ट्रान्सफर करायला विसरतात. त्यामुळे नवीन कारसाठी विमा घेताना ते जास्त प्रीमियम भरतात. अशा परिस्थितीत एनसीबीचा वापर कसा करायचा, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

1. रस्त्यावर वाहन चालवण्यापूर्वी त्याची विमा पॉलिसी काढावी. या पॉलिसीचे वर्षातून एकदा नूतनीकरण करावे. विशिष्ट वर्षात कोणतेही दावे केले नसल्यास, विमा कंपन्या प्रीमियम माफ करतील. या सवलतीला 'नो क्लेम बोनस' म्हणतात. हे काही पॅरामीटर्सवर अवलंबून असते. पहिल्यावर्षी कोणताही दावा नसल्यास हे 20 टक्क्यांपर्यंत लागू होते.

2. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्षांत कोणताही दावा केला नसल्यास, NCB अनुक्रमे 25%, 35%, 45% आणि 50% पर्यंत उपलब्ध असेल. ते कमाल 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे. वाहन विमा पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी प्रीमियमचे दडपण कमी करण्यासाठी क्लेम बोनस उपयुक्त आहे. NCB मध्ये स्वतःच्या नुकसानी (OD) प्रीमियम पॉलिसींसाठी लागू आहे.

3. लहान नुकसानीसाठी दावा केला नसल्यास, तुमच्याकडे मोठी NCB असेल. उदाहरणार्थ, पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी तुम्ही रु. 5,000 नो क्लेम बोनस (NCB) साठी पात्र आहात. आता किरकोळ दुरुस्तीसाठी 2,000 रुपये खर्च येतो. मग आपल्या हाताने पैसे देणे चांगले आहे. तुम्ही दावा केल्यास, तुम्ही नो क्लेम बोनस गमवाल. विम्याचा दावा करायचा की नाही हे ठरवण्यापूर्वी अशी सर्व गणना केली पाहिजे.

4. NCB हस्तांतरण अगदी सहज करता येते. विमा कंपनीकडून ऑफलाइन पॉलिसी घेताना, कंपनीशी थेट संपर्क साधा आणि NCB हस्तांतरणासाठी आवश्यक कागदपत्रे सबमिट करा. विमा कंपनी तुमचे NCB प्रमाणपत्र देईल. हे प्रमाणपत्र नवीन विमा कंपनीला देण्यात यावे. त्यानंतर तुमची एनसीबीमध्ये बदली होईल. ऑनलाइन खरेदी करताना जुनी पॉलिसी क्रमांक आणि विमा कंपनीचे नाव NCB साठी नवीन कंपनीला द्यावे. नवीन विमा कंपनी तुम्हाला NCB हस्तांतरित करेल. एनसीबीचे हे प्रमाणपत्र तीन वर्षांसाठी वैध आहे.

5. जोपर्यंत तुम्ही जुन्या गाडीचे मालक आहात, तोपर्यंत हे NCB नवीन वाहनात हस्तांतरित करता येणार नाही. जुन्या कारची विक्री किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे हस्तांतरित केल्यावरच हे शक्य आहे. मोटार विमा पॉलिसीची मुदत संपल्याच्या ९० दिवसांच्या आत नूतनीकरण न केल्यास, NCB रद्द केले जाईल. आता विमा कंपन्या देखील पूरक पॉलिसी म्हणून NCB संरक्षण देत आहेत, याची चौकशी करता येईल.

हेही वाचा : Air India Tale Art : कोचीतील कला महोत्सवात एयर इंडियाच्या नव्या टेल आर्टचे अनावरण

ABOUT THE AUTHOR

...view details