आज 'व्हॅलेंनटाईन डे' आठवड्याचा पहिला दिवस. आजपासून प्रेमवीर आपले प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात करतात आणि शेवटी ते प्रेम बंधन जुळतील या टप्प्याला येऊन पोहचले की विवाहाची तयारी सुरू होते. मात्र ही विवाहप्रथा कुणी, का, कधी सुरु केली? असा प्रश्न कधी आपल्याला पडला आहे का? चला तर मग जाणून घेऊया, दोन लोकांना आयुष्यभर प्रेमाच्या नात्यात बांधल्या जाणाऱ्या विवाह परंपरेबाबत.
लग्नकार्याची परंपरा कशी सुरु झाली :सुरुवातीला लग्न असे काही नव्हते. स्त्री आणि पुरुष दोघेही स्वतंत्र असायचे. पूर्वीच्या काळी कोणताही पुरुष कोणत्याही स्त्रीला धरून असायचा. याबाबत महाभारतात एक कथा सापडते. एकदा उद्दालक ऋषींचा मुलगा श्वेतकेतू आपल्या आश्रमात बसला होता. त्यानंतर आणखी एक ऋषी तेथे आला आणि त्याच्या आईला घेऊन गेला. हे सर्व पाहून श्वेतकेतूला खूप राग आला. त्याच्या वडिलांनी त्याला समजावून सांगितले की, हा नियम प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. जगातील सर्व महिलांसाठी हा नियम लागू होतो.
श्वेत ऋषींनी याला विरोध केला आणि सांगितले की, ही प्राणी प्रवृत्ती आहे. म्हणजेच प्राण्यांप्रमाणे जीवन जगण्यासारखे आहे. यानंतर त्यांनी विवाहाचा नियम केला. ते म्हणाले की, जी स्त्री गाठ बांधल्यानंतर दुसऱ्या पुरुषाकडे जाते, तिला गर्भपात करण्यासारखेच पाप लागेल. याशिवाय जो पुरुष आपल्या पत्नीला सोडून, दुसऱ्या स्त्रीकडे जातो त्यालाही या पापाचे फळ भोगावे लागते. सोबतच त्यांनी सांगितले की, गाठ बांधल्यानंतर पुरुष आणि महिला मिळून एकत्र संसार करतील. पती हयात असताना स्त्रीला त्याच्या परवानगीविरुद्ध दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवता येणार नाहीत, ही मर्यादा त्यांनी निश्चित केली.
लग्नाचे प्रकार : यानंतर महर्षींनी दीर्घकाळाने एक प्रथा सुरू केली आणि सांगितले की, बायका आयुष्यभर पतीच्या अधीन राहतील. यानंतर नवऱ्याच्या मृत्यूनंतरही लोकांनी बायकांना नवऱ्याच्या चितेवर जाळायला सुरुवात केली. ज्याला 'सती प्रथा' म्हटले जाऊ लागले. यानंतर आर्य लोकांना एकापेक्षा जास्त बायका होऊ लागल्या. त्यामुळे हा नियम करावा लागला. तोपर्यंत लग्न दोन प्रकारची होती. पहिली मारामारी करून, भांडण करून किंवा दमदाटी करून मुलीला पळवून नेत आणि दुसरी यज्ञाच्या वेळी कन्येला दक्षिणा दिली जात असे. यानंतर लग्नाचा अधिकार वडिलांच्या हातात देण्यात आला. त्यानंतर वडील पात्र वरांना बोलावून त्यांच्यामधून आपली मुलगी निवडण्यास सांगत. पूर्वी आठ प्रकारचे विवाह होत होते. दैव, ब्रह्मा, आर्ष, प्रजापत्य, असुर, गंधर्व, राक्षस आणि पैशच. पण, आजकाल ब्राह्मोविवाह प्रचलित आहे.
हेही वाचा : Valentine Week List 2023 : कसा साजरा करतात व्हॅलेंटाईन सप्ताह; वाचा सविस्तर