महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UP Fire News: भीषण दुर्घटना! घराला लागलेल्या आगीत होरपळून पाच मुलांसह महिलेचा मृत्यू - UP Fire news 6 deaths

उत्तर प्रदेशमध्ये आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीत एक महिला आणि पाच मुले जिवंत जळाली आहेत.

UP Fire News:
आगीत होरपळून पाच मुलांसह महिलेचा मृत्यू

By

Published : Jun 15, 2023, 9:28 AM IST

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने आगीत पडली भर

लखनौ : उत्तर प्रदेशात एकाच घरातील सहा जणांचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये एक महिला आणि 5 मुले आहेत. मध्यरात्री ही आग लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

कुशीनगरचे जिल्हाधिकारी रमेश रंजन यांनी सांगितले की, रामकोला पोलिस स्टेशन हद्दीतील उर्धा गावात गुरुवारी रात्री उशिरा कुशीनगरमधील घराला आग लागली. सुरुवातीला भाजीपाला व्यापाऱ्याच्या टीनशेडच्या घराला आग लागली. या आगाती महिलेसह पाच चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही आग नायमी यांचा मुलगा सरजू याच्या घरात अज्ञात कारणामुळे मध्यरात्री 12.30 च्या सुमारास लागली. आगीमुळे घरात ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्यांतर आगीने रौद्ररुप धारण केले. टिन शेडने बनवलेल्या घराचे छतही जळून खाक झाले आहे. गॅस सिलिंडरच्या भयानक स्फोटामुळे 20 फूट वर असलेल्या झाडावर टिन अडकले.

ग्रामस्थांचे प्रयत्न ठरले अयशस्वी:पोलीस अधीक्षक धवल जयस्वाल यांनी सांगितले की, आग लागल्यावर गावातील लोक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेत आग आटोक्यात आणली. भाजी व्यापारी नायमी यांची पत्नी संगीता (३८ वर्षे), मुली अंकिता (१० वर्षे), लक्ष्मी (९ वर्षे), रिता (३ वर्षे), गीता (२ वर्षे) आणि बाबू (१ वर्षे) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. एसडीएम कप्तानगंजसह महसूल आणि पोलिसांचे पथक पुढील कारवाई करत आहेत. आग लागल्यानंतर प्रथम घरातील विद्युत उपकरणे, गॅस सिलिंडर व नळ बंद करावेत, असा तज्ज्ञांकडून सल्ला देण्यात येतो.

कोलकातामध्ये विमानतळावर आग:कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात रात्री उशिरा भीषण आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. डमडम विमानतळाच्या 3C निर्गमन टर्मिनल कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागली. आगीमुळे विमानतळावर सगळीकडे धूर पसरला होता. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अग्निशमन दलाकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा-

  1. Fire At Kolkata Airport : कोलकाता विमानतळावर आगीचे तांडव, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या पोहचल्या
  2. MP Satpura Bhawan Fire: सातपुडा इमारतीला लागली आग; १५ तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

ABOUT THE AUTHOR

...view details