महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Viral Video: दिल्लीच्या हॉटेलने काश्मीर आयडीवर रूम देण्यास दिला नकार

दिल्लीतील एका हॉटेलमध्ये एका काश्मिरी तरुणाला रुम न दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हॉटेलच्या रिसेप्शनवर उपस्थित असलेली तरुणी, त्या तरुणाशी बोलत आहे की, पोलिसांनी काश्मिरी लोकांना हॉटेलमध्ये रुम देण्यास नकार दिला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

delhi
delhi

By

Published : Mar 24, 2022, 6:07 PM IST

नई दिल्ली :दिल्लीतील जहांगरपुरी येथील एका हॉटेलमध्ये ( Incident at Jahangirpuri Hotel ) एका काश्मिरी तरुणाला खोली न दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हॉटेलच्या रिसेप्शनवर उपस्थित असलेली तरुणी त्या तरुणाला सांगत आहे की, पोलिसांनी काश्मिरी लोकांना हॉटेलमध्ये रुम देण्यास मनाई केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. काश्मिरी लोकांना हॉटेल्समध्ये रुम न देण्याबाबत पोलिसांकडून कोणत्याही सूचना देण्यात आल्या नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीला यामुळे हॉटेलमध्ये रुम देत नाही, कारण त्या व्यक्तिकडे जम्मू-काश्मीरचे ओळखपत्र ( Identity card of Jammu-Kashmir ) आहे. त्याने ओयोच्या माध्यमातून हॉटेलमध्ये रूम बुक केली होती, पण तो दिल्लीत पोहोचल्यावर त्याला रूम देण्यात आली नाही.

तरुणाने स्वतः रिसेप्शनवर उपस्थित असलेल्या तरुणीचा व्हिडिओ बनवला आणि तिला याचे कारण विचारले. तेव्हा ती मुलगी कॉलवर तिच्या बॉसशी बोलते. मग ती सांगते की, पोलिसांनी काश्मिरी लोकांना रुम देण्यास मनाई केलीआहे. त्यामुळे तुम्हाला हॉटेलमध्ये रुम दिली जाणार नाही.

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. काश्मिरी लोकांना दिल्लीतील कोणत्याही हॉटेलमध्ये रुम दिली जाऊ नये, असे पोलिसांनी म्हटलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

दिल्ली पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी हे खोटी अफवा पसरवली जात आहे. दिल्ली पोलीस याबाबत कायदेशीर कारवाई करू शकतात. ओयोच्या या हॉटेलमध्ये रुम न दिल्याने काश्मिरी तरुण परिसरातील दुसऱ्या हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या नावाखाली हॉटेलचा खोटारडेपणा आणि ढोंग सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दिल्ली पोलिसांनी अद्याप हॉटेलवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details