महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात बसचा भीषण अपघात; 12 जण जखमी

देशातील वेगवेगळ्या भागात सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. एकूण प्रवाशांपैकी 12 जण जखमी झाले असून 2 प्रवाशांची प्रकृती नाजूक आहे. तर 70 पेक्षा जास्त प्रवाशी सुरक्षित आहेत. महाराष्ट्रातील पूण्यातून ही बस बस्ती जिल्ह्यात आली होती.

अपघात
अपघात

By

Published : Oct 8, 2021, 9:40 AM IST

लखनऊ -उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. बस अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. एकूण प्रवाशांपैकी 12 जण जखमी झाले असून 2 प्रवाशांची प्रकृती नाजूक आहे. तर 70 पेक्षा जास्त प्रवाशी सुरक्षित आहेत. पोलीस बचावकार्य करत आहे. महाराष्ट्रातील पूण्यातून ही बस बस्ती जिल्ह्यात आली होती. बसचा अपघात शहरातील अमहट पुलावर झाला.

देशातील रस्ते अपघात आणि त्यातील मृतांची संख्या बघितली तर आपल्या देशात रस्ता सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे जाणवते. देशातील वेगवेगळ्या भागात सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार देशात रस्ते अपघातात दररोज सरासरी 415 जणांचा मृत्यु होतो. तर दरवर्षी साडेतीन लाखांहून अधिक लोकांना अपघातामुळे कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागते.

रस्ता सुरक्षा ही सामाजिक जबाबदारी -

तंत्रज्ञानाचा वापर, जागरुकता वाढविणे, रस्ते सुरक्षा उपायांची कठोर अंमलबजावणी अशी पावले जोपर्यंत गांभीर्याने उचलली जात नाही, तोपर्यंत सकारात्मक परिणाम दिसून येणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. बऱ्याच अपघातांमागे जास्त वेग हे कारण असल्याने याविषयी वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. रस्ता सुरक्षेकडे सामाजिक जबाबदारी म्हणून बघितले तरच अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. सरकार आणि नागरिकांच्या एकात्मिक सहकार्यातूनच हे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनीच वाहतुक नियमांचे पालन करून जबाबदारीने वागल्यास रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.

हेही वाचा -उत्तरप्रदेश : अंत्यविधीहून परत येताना काळाचा घाला, सहा जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details