महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 2, 2023, 4:38 PM IST

ETV Bharat / bharat

Tomorrow Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना आर्थिक लाभाचा दिवस, चांगली बातमी मिळू शकेल, वाचा, उद्याचे राशी भविष्य

उद्या कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. उद्याची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 3 मार्चच्या दैनिक कुंडलीत उद्याचे राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Tomorrow Horoscope
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जन्मकुंडलीतील उद्या 3 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा उद्याचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशी भविष्य.

मेष :चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजची सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार - व्यवसायात लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. आपल्या विचारात एकदम बदल होईल. दुपार नंतर मात्र मनाचा खंबीरपणा कमी होऊन मन विचारात गढून जाईल. मानसिक शैथिल्य जाणवेल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे.

वृषभ : चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. आज दिवसाचा बहुतांश वेळ आपण आर्थिक नियोजन करण्यासाठी द्याल.

मिथुन : चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज आप्तेष्टांचा सहवास आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल. मनात विविध प्रकारचे नकारात्मक विचार येतील, ते दूर सारणे हितावह राहील. व्यापार- व्यवसायात वातावरण अनुकूल असल्याने मन प्रसन्न राहील. दिवसभर मनात उत्साह आणि चैतन्य दरवळेल.

कर्क :चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस प्राप्तीच्या प्रमाणात अधिक खर्च करण्याचा आहे. नेत्र विकार बळावतील. मानसिक चिंता वाढतील. कोणाशी वाद होऊ नयेत म्हणून आपल्या कृतींवर संयम ठेवा. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आर्थिक लाभ संभवतात. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मनातून नकारात्मक विचार दूर होऊ शकतील.

सिंह : चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजची सकाळची वेळ फारच चांगली आहे. सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक बातम्या प्राप्त होतील. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल. दुपार नंतर आपल्या बोलण्यामुळे काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. अपघाताची शक्यता आहे. एखादी मानसिक चिंता सतावेल. कुटुंबीय व संतती यांच्याशी मतभेद होण्याचे प्रसंग घडतील. प्रकृतीस त्रास संभवतो.

कन्या : चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. कुटुंबियांशी सलोखा राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. त्यामुळे आपण आनंददित व्हाल. दुपार नंतर आपली उक्ती आणि कृती यांमुळे काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. जवळपासच्या एखाद्या रमणीय स्थळी सहलीस जाल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. मित्रांकडून लाभ होतील.

तूळ : चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज सकाळी आपले मन चिंतातुर होईल. शारीरिक दृष्टया शैथिल्य व आळस वाढेल. नोकरीत वरिष्ठ नाराज होतील. संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. वरिष्ठांची मर्जी संपादन केल्याने पदोन्नती मिळविण्याचा आपला मार्ग सुकर होईल. सामाजिक क्षेत्रातही मान- सन्मानाचे प्रसंग येतील. प्रकृती उत्तम राहील.

वृश्चिक : चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हातून एखादे अवैध कार्य होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आपले बोलणे संयमित ठेवल्यास परिस्थिती आपणास अनुकूल होऊ शकेल. पोटदुखीच्या विकाराने त्रस्त व्हाल. व्यावसायिक क्षेत्रात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. व्यापार - व्यवसायात प्रतिकूलता जाणवेल.

धनू : चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सकाळी मनोरंजनात्मक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपार नंतर मात्र मनात नकारात्मक विचारांचे वादळ निर्माण होईल. व त्यामुळे मन दुःखी होईल. रागाचे प्रमाण वाढेल. कुटुंबीय व सहकार्यांशी वाद संभवतात.

मकर : चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपणास आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. सामाजिक मान- सन्मान संभवतात. आर्थिक लाभ होतील. दुपार नंतर स्वकीय व मित्र यांच्या सहवासात आनंदित होऊ शकाल. वाहनसौख्य मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदित व्हाल.

कुंभ :चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्यात कले विषयी विशेष गोडी निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. दुपार नंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आर्थिक लाभ होतील. व्यापार -व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वाणीवर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल.

मीन : चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. अती विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा टाळणे हितावह राहील. अपचन व पोटाच्या तक्रारी यामुळे शारीरिक अस्वस्थता जाणवेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते.

ABOUT THE AUTHOR

...view details