या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया, तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट जानेवारीच्या दैनिक कुंडलीत उद्याचे राशीभविष्य.
मेष राशी : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपले प्रत्येक काम उत्साह व आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. शरीर व मन स्फूर्ती आणी टवटवीतपणाने भरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्र व स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. आई कडून लाभ होईल. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ, रुचकर भोजन व भेटवस्तू मिळाल्याने आपला आनंद वाढेल.
वृषभ राशी :आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज क्रोध व निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. घर - परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल. गैरसमजा पासून जपून राहावे.
मिथुन राशी :आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात माधुर्याचा आनंद घ्याल. संतती कडून आनंददायी बातम्या मिळतील.
कर्क राशी : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीय ह्यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहतील. मान - प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. सरकारी कामात अनुकूलता लाभेल.
सिंह राशी : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारी मुळे अस्वस्थता अनुभवाल. नोकरी - व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठांशी मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मांगलिक कार्य किंवा प्रवास ह्यामुळे मनाची अशांती दूर होईल.
कन्या राशी : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज 'मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. जलाशया पासून दूर राहा. खर्च खूप होईल. गूढ विद्या व रहस्य ह्यांची गोडी लागेल.
तूळ राशी : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नालिंगी किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आपणास खूप आनंद होईल. नवीन वस्त्रालंकारांची खरेदी किंवा परिधान करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक मान - सन्मान प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रेमाची उब व सहवास ह्यामुळे आपण आनंदित व्हाल.
वृश्चिक राशी :आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य व उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रू ह्यांच्यावर आपण मात करू शकाल. कामात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. मित्र - मैत्रिणींचा सहवास तसेच प्रणयालापामुळे आपला आनंद व्दिगुणित होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतीत. प्रकृतीत सुधारणा होईल.
धनु राशी : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील व त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. पोटाच्या तक्रारीने हैराण व्हाल. वाद - विवाद किंवा चर्चा यामुळे समस्या निर्माण होईल. संततीची काळजी वाटेल. प्रेमीजनांना प्रेमालापासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. धनप्राप्ती होईल.
मकर राशी :आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज उत्साह व स्फूर्ती ह्यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन खिन्न होईल. वेळेवर भोजन व शांत झोप मिळणार नाही. स्त्रीवर्गा कडून काही नुकसान होईल किंवा काही कारणाने त्यांच्याशी मतभेद होतील. धन, खर्च व अपयश ह्या पासून सांभाळून राहावे लागेल.
कुंभ राशी : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपणास चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. दांपत्य जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आर्थिक लाभ व सामाजिक मान - प्रतिष्ठा मिळेल.
मीन राशी : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपणास बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीय व प्रियजन ह्यांच्याशी मतभेद संभवतात. विनाकारण खर्च होतील. आपल्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव होईल. खाण्या - पिण्यावर संयम ठेवावा लागेल. एकंदरीत आजचा दिवस विचार पूर्वक वागण्याचा आहे.