महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tomorrow Horoscope : 'या' राशींच्या लोकांना नवीन कार्याच्या आयोजनासाठी उद्याचा दिवस अनुकूल, वाचा, उद्याचे राशिभविष्य - People of this zodiac sign

29 डिसेंबर 2022 रोजी जन्मकुंडलीतील आजच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ई टिव्ही' भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य. 29 DECEMBER 2022 . HOROSCOPE FOR THE DAY 29 DECEMBER 2022 . Tomorrow Rashi Bhavishya. Thursday Rashi Bhavishya

Tomorrow Horoscope
उद्याचे राशिभविष्य

By

Published : Dec 28, 2022, 7:15 PM IST

या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट डिसेंबरच्या दैनिक कुंडलीत. 29 DECEMBER 2022 . HOROSCOPE FOR THE DAY 29 DECEMBER 2022 . Tomorrow Rashi Bhavishya. Thursday Rashi Bhavishya

मेष :आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या सहलीचे यशस्वी नियोजन करू शकाल. दुपार नंतर मात्र मानसिक एकाग्रता होणार नाही. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. स्वकीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल.

वृषभ :आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल. दांपत्य जीवनात आनंद दरवळेल. नवीन कार्याच्या आयोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ संभवतात. एखाद्या रमणीय स्थळी सहलीचे आयोजन करू शकाल.

मिथुन :आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृतीत चढ-उतार येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष झाल्याने आपणास मानसिक त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपार नंतर कार्यातील यश दृष्टिक्षेपात आल्याने मनाला आनंद वाटेल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल होईल. वडीलधार्यांच्या आशीर्वादाने तुमचे कार्य तडीला जाईल. नोकरीत बढती संभवते. धन मिळेल.

कर्क : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज मन अशांत व निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्ये व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे लागेल. पैशांची चणचण भासेल. दुपार नंतर मात्र प्रकृती चांगली राहिल्याने मनःस्वास्थ्य मिळेल. आनंदप्राप्तीसाठी खर्च होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. एखाद्याशी वाद व मतभेद होण्याची शक्यता आहे.

सिंह : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र व स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीस जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र अती विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. संतापामुळे कार्ये बिघडतील, पण बोलण्यावर संयम ठेवून परिस्थिति हाताळू शकाल. पैशाची चणचण भासेल.

कन्या : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. भावनेच्या भरात आपण वाहवत जाण्याची शक्यता आहे. दुपार नंतर दिवस आनंदात जाईल. व्यापारात भागीदारांकडून लाभ होतील.

तूळ : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृश्चिक : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज हट्ट सोडणे हितावह राहील. आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. वैभवी वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. माते कडून लाभ होईल. दुपार नंतर विचारात एकदम बदल होईल. नवीन कामात अडचणी येतील. बौद्धिक आणि तार्किक कामे करू शकाल. पोटाच्या तक्रारी संभवतात. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे.

धनु :आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील व प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. दुपार नंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल. मानसिक ताण राहील. स्त्री वर्गाचा प्रसाधनांवर खर्च होईल. घर, जमीन, वाहन इत्यादींच्या व्यवहारात फसवणूक संभवते. विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्तीच्या दृष्टिने आजचा दिवस अनुकूल आहे.

मकर :आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज एखाद्या मंगल कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल. वाद - विवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांचे मन दुखावेल व ते आपल्यावर नाराज होतील. दुपार नंतर मनातील चिंता दूर होतील. मित्र व स्वजनांच्या भेटीने मन आनंदी होईल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांच्या प्रेमाचा आपल्यावर वर्षाव होईल.

कुंभ : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपले मन आनंदी राहील. मनात नकारात्मक विचार येतील. आपल्या कृती संयमित ठेवाव्या लागतील. अचानकपणे खर्च उदभवतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. आपण केलेल्या कामाकडे कोणी लक्ष न दिल्याने आपणास नैराश्य येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील.

मीन : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आर्थिक देवाण- घेवाण, वसुली, थकबाकी इत्यादी कार्यात व गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात सावध राहावे लागेल. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. धार्मिक व परोपकारी कार्यात मन गुंतेल. मित्रांकडून भेट वस्तू मिळतील. घरगुती वातावरण आनंदाचे राहील. Tomorrow Rashi Bhavishya.

ABOUT THE AUTHOR

...view details