मुंबई :जन्मकुंडलीतील उद्या 2५ फेब्रुवारी 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा उद्याचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशी भविष्य.
मेष : मेष राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह आनंदात व उत्साहात वेळ जाईल. मातेकडून लाभ संभवतात. मित्र व संबंधितांमुळे घरातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ : मेष राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज आपणास सावध राहावे लागेल. आज घडणार्या घटनांमुळे आपल्या काळजीत भर पडेल. आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नेत्र विकार संभवतात. कुटुंबीयांचा विरोध व रुसवा यास सामोरे जावे लागेल. आज सुरू केलेले काम अपूर्ण राहील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल व कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. एखादा अपघात संभवतो.
मिथुन :मेष राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल आहे. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. कुटुंबियांकडून सुद्धा काही लाभ संभवतो. स्वादिष्ट भोजन प्राप्ती होईल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. संततीकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. नोकरी-व्यवसायात लाभ होतील. प्राप्तीत वाढ संभवते. वैवाहिक सौख्य लाभेल.
कर्क : मेष राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढती संभवते. वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. कुटुंबियासह मनमोकळ्या गप्पा मारू शकाल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कामासाठी प्रवास होतील. मातेशी संबंधात सौहार्दता राहील. सरकारी लाभ होतील. प्रकृती उत्तम राहील.
सिंह : मेष राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आजचा दवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आपल्या हातून योग्य तोच व्यवहार घडेल. आज मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. काही कारणाने आपला संताप वाढेल. परदेशात राहणार्या नातेवाईकां कडून एखादी चांगली बातमी मिळेल. संतती संबंधित व व्यावसायिक कटकटींमुळे आजचा दिवस अशांततेत जाईल.