मुंबई :21 फेब्रुवारी 2023 रोजी जन्मकुंडलीतील उद्याच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशीभविष्य.
आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कसी मिळेल. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया, तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट २१ फेब्रुवारीच्या दैनिक कुंडलीत उद्याचे राशीभविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.
मेष राशी : उद्या चंद्र रास बदलून मकर राशीत प्रवेश करणार आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी - सजावट ह्याचा सुद्धा विचार कराल. कामात समाधान लाभेल. स्त्रीयांकडून एखादा सन्मान होईल. आईशी सुसंवाद साधू शकाल. निरूत्साहीपणा सोडून द्यावा लागेल त्यामुळे आयुष्यात बदल घडतील.
वृषभ राशी : उद्या चंद्र रास बदलून मकर राशीत प्रवेश करणार आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखाद्या रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. दूरवरील मित्रांच्या शुभ बातम्या समजतील. परदेशी जाण्याची संधी लाभेल. व्यापारात आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य मध्यम राहील.
मिथुन राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत प्रवेश करणार आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न केलेलीच हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजारपणात नवीन उपचारास सुरवात न केल्यास उत्तम. आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात बोलण्यावर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने खाण्या - पिण्याची आबाळ होऊ शकते. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
कर्क राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत प्रवेस करणार आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाण्याची शक्यता आहे. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणयक्रिडेतही यशस्वी व्हाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. मात्र प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील.
सिंह राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत प्रवेश करणार आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. स्त्रियांना माहेरहून एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज उदासीनता व साशंकता अधिक प्रमाणात राहिल्याने मन उदास होईल. प्रकृती साधारण राहील. प्रयत्नांच्या मानाने यश कमीच मिळेल.