महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tomorrow Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना प्रिय व्यक्तींचा सहभाग लाभेल, वाचा, उद्याचे राशीभविष्य - दैनिक कुंडलीत उद्याचे राशीभविष्य

18 जानेवारी 2023 रोजी जन्मकुंडलीतील उद्याच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ई टिव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशीभविष्य.

Tomorrow Horoscope
उद्याचे राशीभविष्य

By

Published : Jan 17, 2023, 5:14 PM IST

या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया, तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट जानेवारीच्या दैनिक कुंडलीत उद्याचे राशीभविष्य. 18 जानेवारी 2023 .

मेष :आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात अनपेक्षित अडचणी उदभवतील. नवीन कार्ये हाती घेतल्यास त्यात सुद्धा अडचणी येतील. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

वृषभ : आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज संसारात व दांपत्य जीवनात सुख - शांती अनुभवाल. कुटुंबीय व निकटचे मित्र यांच्या सह उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या जवळच्या प्रवासाचे नियोजन कराल. प्रकृती उत्तम राहील. धनलाभ होईल. दूर राहणार्‍या स्नेह्यांकडून येणारी बातमी आपणास खुश करील. भागीदारीत लाभ व सार्वजनिक जीवनात मान - सन्मान मिळतील.

मिथुन : आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील. सावधानता बाळगा.

कर्क : आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरूवात चिंता व उद्वेगाने होईल. आरोग्याच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. अचानक धन खर्च होईल. पेमीजनांत वाद - विवाद होऊन मतभेद किंवा बोलाचाली होईल. एखादी मानहानी संभवते. प्रवासात अडचणी येतील.

सिंह : आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की त्यामुळे आपणास दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे आपणास त्रास होईल. मातेचे आरोग्य बिघडेल. शांत झोप लागणार नाही. अती संवेदनशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो जलाशया पासून दूर राहावे. नोकरीतील वातावरण चिंताग्रस्त राहील. संपत्तीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल.

कन्या : आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज कोणत्याही कार्यात विचार पूर्वकच सहभागी व्हावे. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे व्हाल. आप्तेष्ट व मित्रांचा सहवास घडेल. भावंडाकडून फायदा होईल. शत्रूचा सामना करू शकाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

तूळ : आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपली मनःस्थिती द्विधा झाल्याने आपण कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही. अशा परिस्थितीत नवीन कामाची सुरवात न करणे हितावह राहील. संबंधितांशी मतभेद संभवतात. व्यवहारात हट्टीपणा सोडावा लागेल. प्रवासात अडचणी येतील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबियांशी वाद संभवतात. शक्यतो आज कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक :आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस साधारणच आहे. तन - मनाला सुख - आनंद मिळेल. कुटुंबियांसह उत्साहात व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी आनंददायी बातमी मिळेल. प्रवास सुखद होतील. उत्तम वैवाहिक सुख उपभोगता येईल.

धनु : आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील. आरोग्यास त्रास संभवतो. वर्तन व बोलणे संयमित ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो. खर्चात वाढ होईल. कोर्ट - कचेरीचे प्रश्न काळजीपूर्वक सोडवावे लागतील. फुटकळ कामातून मनःशांती भंग पावेल.

मकर : आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस असल्याने सामाजिक कार्यांतून लाभ होईल. मित्र व स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. पआज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळे मोठे यश मिळू शकेल. वरिष्ठ व वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळाल्याने मनावरील ताण कमी होईल. गृहजीवन आनंदी राहील. मान - मरातब वाढतील.त्नी व संततीचा सहवास लाभेल. खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शेअर बाजारातून फायदा होईल. पत्नीच्या स्वास्थ्या विषयी चिंता निर्माण होईल.

कुंभ :चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज आत्मविश्वासाच्या जोरावर आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. विचार प्रगल्भ होतील. कष्टाच्या मानाने अपेक्षित यश मिळाले नाही तरी आपले काम व्यवस्थितपणे केल्याचे समाधान लाभेल. प्रकुतीची काळजी घ्यावी लागेल.

मीन : आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. मनातील दुःख व अशांतता ह्याने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांशी वाद संभवतात. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. पोटाची तक्रार राहील. नशिबाची साथ लाभणार नाही. मनात नकारात्मक विचार येतील.

ABOUT THE AUTHOR

...view details