महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tomorrow Horoscope : 'या' राशींच्या लोकांना व्यापारातील पैसे मिळविण्यासाठी प्रवास करावा लागेल, वाचा, उद्याचे राशीभविष्य - व्यापारातील पैसे मिळविण्यासाठी प्रवास करावा लागेल

4 फेब्रुवारी 2023 रोजी जन्मकुंडलीतील उद्याच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ई टिव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशीभविष्य.

Tomorrow Horoscope
उद्याचे राशीभविष्य

By

Published : Feb 3, 2023, 5:07 PM IST

या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया, तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट फेब्रुवारीच्या दैनिक कुंडलीत उद्याचे राशीभविष्य.

मेष राशी : आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. मानसिक उदवेग दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. एखाद्या अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.

वृषभ राशी : आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण अती संवेदनशीलतेमुळे व भावूक विचारांमुळे खूप हळवे व्हाल. आपली व इतरां विषयीची काळजी दूर झाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति व सृजनशीलतेने काम कराल. कुटुंबीय व मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. पैशा विषयी दक्ष राहून आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

मिथुन राशी :आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज नातलग व मित्रांशी संवाद साधल्याने आपण आनंदित व्हाल. सुरवातीस आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडू शकाल. महत्वाच्या कामाची सुरुवात उशीरा होईल पण नंतर मात्र सहजगत्या ती पार पडतील. त्यामुळे मनःशांती अनुभवू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.

कर्क राशी : आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपल्या मनात प्रेमालापाचे तरंग उमटतील. दिवसभर त्याच मनःस्थितीत आपण राहाल. मित्र, स्वकीय व संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासह आपण आपला दिवस आनंदात घालवाल. प्रवास, मनपसंत भोजन व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे प्रफुल्लित राहाल. पत्नीच्या सहवासात मन प्रसन्न राहील.

सिंह राशी :आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कोर्ट - कचेरीच्या प्रश्नात सावध राहावे लागेल. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अवैध कृत्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. विदेशातून एखादी आनंददायी बातमी येईल. कायदेशीर गोष्टींचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा.

कन्या राशी : आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल. दांपत्य जीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्ती साठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यापारातील पैसे मिळविण्यासाठी प्रवास करावा लागेल. अविवाहितांना जोडीदाराच्या शोध मोहीमेत यश मिळेल.

तूळ राशी : आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपणाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मनात भावनात्मकता वाढेल. मातुल घराण्याकडून फायदा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जमीन व मालमत्तेचे व्यवहार यशस्वीपणे करू शकाल. आजचा दिवस व्यवसायात यश प्राप्तीचा आहे.

वृश्चिक राशी : आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. लेखन - साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. संततीशी मतभेद होतील. प्रवासाची शक्यता आहे. पैसा खर्च होईल.

धनु राशी :आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामात यश मिळण्यास विलंब झाल्याने नैराश्य येईल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये. प्रकृती भिघडण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्यावर संयम ठेवाव लागेल. खर्चात वाढ होईल.

मकर राशी :आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. त्यामुळे आर्थिक स्तर मजबूत होईल. मान, प्रतिष्ठा वाढेल. एखादा प्रवास संभवतो.

कुंभ राशी : आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळाल्याने प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. स्त्रीयांना माहेरहून अनेक चांगल्या बातम्या मिळतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत सुद्धा सहकारी उत्तम सहकार्य करतील. शरीर व मन प्रसन्न राहील. कौटुंबिक वातावरण सुख - शांतीचे राहील.

मीन राशी :आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपली सृजनशक्ती अधिकच वाढेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्य विश्वाची सफर कराल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. स्वभाव विशेष भावनाशील होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details