मुंबई :जन्म कुंडलीत आज २५ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, आजचे राशी भविष्य.
मेष :मेष राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह आनंदात व उत्साहात वेळ जाईल. मातेकडून लाभ संभवतात. मित्र व संबंधितांमुळे घरातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ :मेष राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज आपणास सावध राहावे लागेल. आज घडणार्या घटनांमुळे आपल्या काळजीत भर पडेल. आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नेत्र विकार संभवतात. कुटुंबीयांचा विरोध व रुसवा यास सामोरे जावे लागेल. आज सुरू केलेले काम अपूर्ण राहील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल व कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. एखादा अपघात संभवतो.
मिथुन :मेष राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल आहे. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. कुटुंबियांकडून सुद्धा काही लाभ संभवतो. स्वादिष्ट भोजन प्राप्ती होईल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. संततीकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. नोकरी-व्यवसायात लाभ होतील. प्राप्तीत वाढ संभवते. वैवाहिक सौख्य लाभेल.
कर्क : मेष राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढती संभवते. वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. कुटुंबियासह मनमोकळ्या गप्पा मारू शकाल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कामासाठी प्रवास होतील. मातेशी संबंधात सौहार्दता राहील. सरकारी लाभ होतील. प्रकृती उत्तम राहील.
सिंह : मेष राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आजचा दवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आपल्या हातून योग्य तोच व्यवहार घडेल. आज मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. काही कारणाने आपला संताप वाढेल. परदेशात राहणार्या नातेवाईकां कडून एखादी चांगली बातमी मिळेल. संतती संबंधित व व्यावसायिक कटकटींमुळे आजचा दिवस अशांततेत जाईल.
कन्या : मेष राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्यास अनुकूल आहे. मात्र, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे पदार्थ खाण्या - पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. खर्च वाढतील. सरकार विरोधी कृत्यापासून दूर रहा. वादा पासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा.
तूळ : मेष राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. प्रिय व्यक्तीसह प्रेमालाप होऊ शकेल. मित्रासह केलेल्या प्रवासातून आनंद मिळेल. नवीन वस्त्रालंकाराची खरेदी होऊ शकेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मान-सम्मान होतील. रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल. वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल.
वृश्चिक : मेष राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आज घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा होईल. शत्रूवर मात करू शकाल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी ओळखी होतील. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी ऐकावयास मिळेल. धनलाभ होईल. कामे पूर्ण होतील.
धनू : मेष राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून, प्रवासात त्रास संभवतो. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्यांची काळजी राहील. कामे अपूर्ण राहिल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कला व साहित्याकडे मनाचा कल होऊन विविध कल्पना सुचतील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बौद्धिक चर्चे पासून दूर राहणे हितावह राहील. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस अनुकूलतेचा आहे.
मकर : मेष राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. स्फूर्तीचा अभाव जाणवेल. कुटुंबियांशी वाद होऊन मतभेद झाल्याने मन व्यथित होईल. मानहानी संभवते. कोणत्याही कामात यश मिळणे अवघड होईल. झोप पूर्ण न झाल्याने आरोग्य बिघडेल.
कुंभ : मेष राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी झल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुद्धा उत्तम राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. विशेषतः भावंडांशी संबंधात गोडी निर्माण होईल. एखादा प्रवास संभवतो.
मीन : मेष राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आज मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. वाद होण्याची शक्यता असल्याने रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल. खाण्या पिण्यावर संयम ठेवावा लागेल. आरोग्य मात्र नरम गरमच राहील.