महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, जाणून घ्या कसा असेल हा आठवडा, कोजागिरी पौर्णिमेचा काय मिळेल लाभ - Weekly Rashibhavishya

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य Weekly horoscope, What will be the position of the planets, 9th TO 15th Octomber 2022, Weekly Rashibhavishya

Weekly horoscope
साप्ताहिक राशीभविष्य

By

Published : Oct 9, 2022, 12:21 AM IST

मेषहा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीला खर्च जास्त झाल्याने आपणास मानसिक थकवा जाणवेल. आपण जर हिंमत ठेवलीत, तर हळू हळू परिस्थिती आपणास अनुकूल होईल. आपली प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा आपल्या आहारावर लक्ष ठेवावे. कारण आपणास असंतुलित आहाराची संवय आहे, ज्यामुळे आपण आजारी पडू शकता. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात प्राप्तीत वाढ झाल्याने आपले मन प्रसन्न होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. आपल्या गोष्टी इतरांना सांगू नये. आपली कमकुवत बाजू कोणाला सांगितल्यास लोक त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकतील. आपण आपल्या प्रेमिकेसाठी एखाद्या सुंदर वस्तूची खरेदी केल्याने सुद्धा आपल्या खर्चात वाढ होऊ शकते. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभहा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून आपणास चांगली प्राप्ती होईल. आपणास वाहन किंवा एखादी संपत्ती खरेदी करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. आठवड्याच्या मध्यास लहान - सहान खर्च होतील. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण स्वतःसाठी खूप पैसा खर्च कराल. आपण आपले व्यक्तिमत्व खुलविण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी आपण एखाद्या व्यायामशाळेत प्रवेश सुद्धा घेऊ शकाल. ह्या आठवड्यात आपले प्रणयी जीवन अधिक सुखद करण्यासाठी आपण आपल्या प्रेमिकेस मोबाईल किंवा उंची ड्रेस भेट देऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या खांद्यास खांदा लावून आपल्या बरोबर उभा राहील. आपणास कुटुंबियांचे सहकार्य सुद्धा मिळेल. आपण आपल्या मुलांच्या कामाने सुद्धा समाधानी व्हाल. आपण आपल्या विरोधकांवर प्रभुत्व मिळवू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला असला तरी लक्ष विचलित होऊ शकेल अशा गोष्टीं पासून त्यांना दूर राहावे लागेल.

मिथुनहा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. कामाच्या ठिकाणी आपले महत्व वाढेल. त्यामुळे आपली प्रतिमा उंचावेल. आपणास पगारवाढ मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. तसेच सरकारी लाभ सुद्धा मिळू शकतात. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या कामात जलद गतीने प्रगती होईल. आपण नवीन मार्केटिंग तंत्राचा वापर करू शकाल. असे केल्याने आपणास खूप मोठा लाभ होईल. प्रकृती चांगली राहील. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याचे ठरू शकेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन सुद्धा सुखद होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडथळे येण्याची संभावना असून त्यांची एकाग्रता भंग होईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

कर्कहा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपणास समाजात एखाद्या पुरस्काराने सन्मानित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपली प्रतिष्ठा उंचावेल. धार्मिक कार्यातील आपली गोडी कायम राहील. आपण घरात एखादी पूजा करवून घेऊ शकाल किंवा तीर्थयात्रेस जाऊ शकाल. कामाच्या बाबतीत आपणास खूप चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची कामातील रुची वाढल्याने चांगले परिणाम मिळविण्यात त्यांना मदत होईल. व्यापाऱ्यांना आठवड्याच्या मधल्या दिवसात मोठे लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात लहान - सहान खर्च होतील. आपली प्रकृती उत्तम राहील. आपण आपल्या विरोधकांवर मात कराल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आव्हाने येऊन सुद्धा त्यांच्यातील प्रेम टिकून राहील. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेस मोकळेपणाने आपल्या मनातील भावना सांगू शकतील. परस्पर समजूतदारपणा आपले संबंध दृढ करेल. आपणास आपल्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांनी मनापासून मेहनत करावी. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

सिंहहा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस काही विघ्न येण्याची संभावना असल्याने कोणतेही मोठे काम हाती घेऊ नये. आठवड्याचे मधले दिवस चांगले आहेत. कार्यात यशस्वी व्हाल. प्रवास केल्याने थोडा फायदा होण्याची शक्यता सुद्धा आहे. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपल्या कामांना गती आल्याने आपणास चांगले परिणाम मिळतील. संपत्तीशी संबंधित लाभ संभवतात. जंगम किंवा स्थावर मिळकत खरेदी करण्यात आपण यशस्वी व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. खर्च कमी होतील. प्रकृती उत्तम राहील. प्रेमीजनांना सुखद परिणाम मिळतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी काही नवीन लोकांची भेट घ्यावी लागेल. तसेच मार्केटिंग सुद्धा करावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एखाद्याच्या सहकार्याची गरज भासेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्याहा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. व्यापारातील नफा वाढल्याने आपली हिंमत वाढेल व आपण आणखी नवीन कामे करण्याचा विचार करून व्यावसायिक प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करू लागाल. आपणास शासनाकडून सुद्धा लाभ मिळण्याची संभावना आहे. बाजारातील अनुभवी लोकांचे सहकार्य सुद्धा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळाल्याने त्यांचा सर्वत्र नांवलौकिक होईल. विवाहितांना संबंधात उब जाणवेल. ते आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतील. आपण कुटुंबियांसह काही दिवसांची रजा घेऊन बाहेरगावी जाण्याची योजना सुद्धा आखू शकाल. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेकडून जाहीरपणे प्रेमाचा कबुली देण्याची अपेक्षा बाळगून राहतील. त्यांना आपल्या प्रेमिकेच्या मुखातून प्रेमाची कबुली ऐकावयास खूपच आवडते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपली कुशाग्र बुद्धी ज्ञानात भर घालण्यास मदतरूप होईल. नवीन शिकण्याची जिज्ञासा आपल्या कामी येईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

तूळहा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात नवीन आनंदाचे क्षण येतील. आपण आपल्या वैवाहिक जीवनाकडे एका नवीन दृष्टिकोनातून बघाल. आपला वैवाहिक जोडीदार सुद्धा आपल्या खांद्यास खांदा लावून सतत आपल्या बरोबर उभा राहील. त्यामुळे आपण आनंदित व्हाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्यच आहे. कौटुंबिक जवाबदाऱ्या सांभाळून आपण आपल्या प्रणयी जीवनासाठी सुद्धा वेळ काढाल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपण नव्याने गुंतवणूक करण्याचा विचार करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चढ - उताराने भरलेला आहे. काही चिंतांमुळे आपल्या कामात चूक होण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. प्रकृती चांगली राहील. आपला नांवलौकिक होऊन एखाद्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी सुद्धा आपणास मिळू शकेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात सामान्य परिणाम मिळतील. आठ्वड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिकहा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. विवाहितांना मुलांकडून चांगले सौख्य मिळेल. त्यांच्या कडून आपणास एखादी चांगली बातमी सुद्धा मिळेल. कदाचित त्यांना चांगली नोकरी मिळालेली असेल. त्यामुळे आपण आनंदित व्हाल. घरात एखादा समारंभ करण्यात येऊ शकतो. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण मुक्तपणे आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकाल. आपल्या प्रेमिकेची ओळख आपल्या मित्रांना करून देऊ शकाल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी आशेचे किरण घेऊन येणारा आहे. आपल्या कामाचे चांगले परिणाम मिळत असल्याचे बघून आपण आनंदित व्हाल. आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा त्यांच्या कामात प्रगती होत असल्याचे दिसेल. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचा सुद्धा नांवलौकिक होईल. आपली प्रकृती उत्तम राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. हा आठवडा विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळवून देणारा आहे.

धनूहा आठवडा आपल्यासाठी खूप चांगले परिणाम घेऊन येणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस, आपण संपूर्ण लक्ष आपल्या कुटुंबावर केंद्रित कराल. आपण नवीन वस्तूंची खरेदी करून घरात सजावट कराल. ह्या आठवड्यात संपत्तीशी संबंधित काही नवीन सौदे आपल्या हाती लागू शकतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपली कामगिरी उत्तम होईल. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात आपली मेहनत वाढवावी लागेल. असे केल्याने दीर्घ काळा नंतर त्यांना सकारात्मक परिणाम मिळू लागतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव असण्याची शक्यता आहे. प्रेमीजन आपले प्रणयी जीवन मुक्तपणे जगू शकतील. आपण बँक किंवा एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेण्यात यशस्वी होऊ शकाल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. अभ्यासात चांगले परिणाम मिळवून ते नांवलौकिक कमावू शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मकरहा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच चांगले परिणाम मिळण्यास सुरवात होईल. आपले मित्र आपणास मदत करतील. तसेच नातेवाईक व शेजारी सुद्धा मदत करतील. आपल्या कुटुंबातील लहान व्यक्ती आपल्यावरून त्यांचा जीव ओवाळून टाकतील. आपल्यावर मनापासून प्रेम करून आपणास पाठिंबा देतील. आपणास एखादा प्रवास सुद्धा करावा लागेल. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती अनुकूल वातावरणाचा लाभ घेऊन आपल्या कामात पुढे जातील. व्यावसायिकांना व्यावसायिक हेतूने केलेल्या प्रयत्नात यश प्राप्त होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन काहीसे निरस होण्याची संभावना आहे. हि नीरसता घालविण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. प्रेमीजन आपल्या संबंधांमुळे उत्साहित होतील. आपल्या प्रेमिकेसाठी बरेच काही करण्याची इच्छा ते बाळगून असतील. कदाचित ते आपल्या प्रेमिकेस रात्री भोजनास सुद्धा घेऊन जाऊ शकतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची काळजी करण्याची गरज नाही. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. मीडिया व फाईन आर्टस् ह्यांच्याशी संबंधित असणाऱ्यांना मोठा लाभ होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभहा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस, आपण प्रवास करून अनेक क्षेत्रात चांगले परिणाम मिळवाल. प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. कायदेशीर कारवाई पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा अडचणीत सापडू शकाल. खर्चात वाढ होईल. आपणास कुटुंबातील सर्वात लहान व्यक्तीचे सहकार्य मिळेल. त्यामुळे आपल्या कामात खूप फायदा होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले असेल. प्रेमीजन सुखद क्षणांचा आनंद घेतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूप चांगली बातमी घेऊन येणारा आहे. आपल्या नफ्यात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळतील. आपल्या कामगिरीत सुधारणा होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत गंभीर होतील. ते वेळापत्रक बनवून आपल्या अभ्यासाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीनहा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या व्यावसायिक भागीदारास भेटण्याची व संपूर्ण टीम सह मिटिंग करण्याची संधी मिळेल. त्यामुळे आपणास नवीन लोकांच्या संपर्कात येण्याची संधी सुद्धा मिळेल. असे झाल्याने आपण व्यावसायिक वृद्धी करू शकाल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत चांगले परिणाम मिळतील. आपली प्रशंसा होईल. आपली कामगिरी उत्तम होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात रोमांसा व्यतिरिक्त परस्पर समजूतदारपणा व एकमेकांवर निर्भरतेची भावना राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा परीक्षेचा आहे. आपण एकमेकांना किती समजू शकता ते जाणून घेण्याची संधी मिळेल. आवेशात येऊन एकमेकांसाठी अपशब्द वापरू नयेत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. प्रवासास हा आठवडा प्रतिकूल आहे. विशेषतः अखेरचे तीन दिवस.Weekly horoscope, What will be the position of the planets, 9th TO 15th Octomber 2022, Weekly Rashibhavishya

ABOUT THE AUTHOR

...view details