मेषहा आठवडा आपल्यासाठी बराचसा चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून आपली कामावरील पकड चांगली राहिल्याने आपणास प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना नशिबाची साथ मिळून कष्टाचे यथोचित फळ मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीची प्रशंसा करतील. आठवड्याच्या मध्यास आपण आपल्या कौटुंबिक जीवनावर सुद्धा लक्ष द्याल. आपले संपूर्ण लक्ष आपल्या आई - वडिलांच्या प्रकृतीवर असेल. आपण त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाऊ शकाल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपल्या प्राप्तीत वाढ होईल. येणाऱ्या तेजीने आपण सुखावले जाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य राहील. प्रणयी जीवनातील आपली वागणूक सामान्यच असेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणावाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अनुभवी लोकांचे सहकार्य मिळाल्याने ते अधिक चांगला अभ्यास करू शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
वृषभहा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून व्यवसायात नफा होऊ लागल्याने आपण खूपच आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसून येईल. परंतु, बँके कडून घेतलेल्या कर्जामुळे आपली मानसिक चिंता वाढून आपण व्यथित होण्याची संभावना आहे. आठवड्याच्या मध्यास ह्या चिंतेतून बाहेर पडण्याचा मार्ग आपणास सापडल्याने आपण आनंदित व्हाल. आपली काळजी कमी होऊ लागेल. प्रकृती चांगली राहिली तरी ती बिघडणार नाही ह्याची काळजी घ्यावी. आपण मित्रांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन सुखद होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा अद्भुत राहील. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदारावर पूर्ण विश्वास असेल. आपण दोघेही आनंदात राहाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाचा आनंद घेता येईल. जे स्वतःचे काम इमानदारीने करतात त्यांना सुद्धा व्यवसाय करण्याची कला अवगत होऊन त्याची अंमल बजावणी करण्याचा प्रयत्न सुद्धा ते करतील. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मिथुनहा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. व्यापारात जलद गतीने प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. आपण आपल्या कामात पारंगत व्हाल. आपली कामे आपण उत्तम प्रकारे पूर्ण करू शकाल. आपणास वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. लहान - सहान खर्च झाले तरी प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात समजूतदारपणा असल्याचे दिसून येईल. आपला वैवाहिक जोडीदार आपणास कामात मदत करेल. प्रेमीजन चिंतीत असून सुद्धा आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधू शकतील. कौटुंबिक वातावरण सुखद असेल. आपली प्रकृती चांगली राहील. आपली वाणी आकर्षक राहील. आपले व्यक्तिमत्व खुलून उठेल. विद्यार्थी खोलात शिरून अभ्यास करतील. त्यामुळे त्यांचा समजूतदारपणा वाढेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कर्कह्या आठवड्यात आपण कल्पना विश्वात वावराल. काहीतरी विधायक कार्य करण्याचा विचार कराल. आपणास प्रॉपर्टीतून लाभ मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. प्रणयी जीवन सुखद होईल. आपण आपल्या प्रेमिकेप्रती खूपच भावनाशील होऊन तिचा खूपच चांगल्या पद्धतीने सांभाळ कराल. तिला एखादी सुंदरशी भेट सुद्धा देऊ शकाल. विवाहित व्यक्ती आपले संबंध अधिक दृढ करतील. वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण शासनाकडू एखादे फायदेशीर काम सुद्धा मिळवू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. त्यांची कामगिरी उत्तम होईल. आपण सामाजिक माध्यमांवर खूपच व्यस्त राहाल. आपल्या एखाद्या फोटोला किंवा विडिओला खूप पसंती मिळू शकेल. त्यामुळे आपण आनंदित व्हाल. आपणास नशिबाची साथ मिळेल. प्रकृती उत्तम राहील. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढल्याने त्यांना अभ्यासात चांगला फायदा होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
सिंहहा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास काही नवीन योजनांवर काम करावे लागेल. हि कामे आपल्यासाठी आव्हानात्मक असतील. परंतु, आपण इच्छा शक्तीच्या जोरावर ती सहजपणे करून त्यात यश मिळवू शकाल. विद्यार्थी एखाद्या स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून आनंदित होतील. त्यांचे मनोबल उंचावल्याने अभ्यासात त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात प्रवासाची संधी मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ - उतार येतील. प्रेमीजनांना आपल्या प्रेमिके समोर आपले मन मोकळे करण्याची संधी मिळेल. ते आपले संबंध अधिक दृढ करू शकतील. व्यापाऱ्यांना आपल्या कामात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची आपल्या कामावरील पकड मजबूत होईल. ते प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने उचलतील. आपली प्रकृती चांगली राहील. कुटुंबात एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल. आपण स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
कन्याहा आठवडा आपणास मजबुती प्रदान करणारा आहे. आपण आपल्या कुटुंबाच्या गरजांना समजू शकाल. आपण कुटुंबियांच्या सहवासात बराचसा वेळ घालवू शकाल. आपण कुटुंबियांसह एखाद्या लांब पल्ल्याच्या प्रवासाचे आयोजन सुद्धा करू शकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात समाधानी राहतील. आपला वैवाहिक जोडीदार खरोखरच आपल्यासाठी योग्य असल्याचे आपणास जाणवेल. हा विचार आपले संबंध अधिक दृढ करेल. व्यापाऱ्यांना व्यापारात लाभ होईल. आपले कार्य जलद गतीने प्रगती करेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कार्य कौशल्यामुळे व कामगिरीमुळे सन्मानित होतील. आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल. विद्यार्थी आपला अभ्यास सतर्कतेने करतील. आठवड्याचे सुरवातीचे व मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.