मेष -हा आठवडा आपल्यासाठी धनदायी आहे. अर्थात धन प्राप्ती म्हणजेच सर्व काही नाही. आपणास आपल्या वाढीव खर्चांवर सुद्धा लक्ष ठेवावे लागेल. आपण खूप खरेदी कराल, ज्यात महागड्या टी. व्ही. चा समावेश सुद्धा असू शकतो. कुटुंबात काही तणाव असल्याचे दिसून येईल, मात्र आपण कुटुंबा ऐवजी आपल्या स्वतःवर जास्त लक्ष द्याल. त्यामुळे आपले कुटुंबीय काहीसे नाराज होण्याची शक्यता आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी विशेष चांगला नाही. आपणास आपल्या प्रिय व्यक्तीच्या क्रोधास सामोरे जावे लागू शकते. आपण जर आपली चूक मान्य केलीत तर शक्य आहे कि आपल्या प्रिय व्यक्तीचा राग मावळून ती आपणास क्षमा करेल. असे करणेच आपल्या हिताचे असेल. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात काही नवीन विचार समजून घेण्याची संधी मिळेल. आपला वैवाहिक जोडीदार त्याच्या बुद्धिमत्तेचा परिचय आपणास करून देईल. आपले आरोग्य उत्तम राहणार असले तरी अति क्रोधा पासून दूर राहावे.
वृषभ -हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. ह्या दरम्यान आपण स्वतःला मानसिक दृष्ट्या कमकुवत समजू लागाल. एखादा मोठा निर्णय घेण्यास आपण अनिच्छुक असाल. असा निर्णय घेणे किती हि अवघड वाटत असले तरी सुद्धा जीवनात प्रगती साधण्यासाठी त्याची आवश्यकता असल्याची जाणीव आपणास ठेवावी लागेल. अशा वेळेस गरज भासल्यास एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. ह्या आठवड्यात कौटुंबिक तणाव काही अंशी कमी होतील. संपत्तीशी संबंधित बाबीत आपणास लाभ होईल. व्यापार वृद्धी होईल. नोकरीतील कामगिरी चांगली होईल. नोकरीत आपल्यावर असलेला दबाव आता संपुष्टात येईल. आपण मोकळेपणाने काम कराल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ घालविण्यासाठी त्यांच्यासह चित्रपट बघण्याची किंवा खरेदीस जाण्याची संधी सुद्धा मिळेल. ह्या दरम्यान आपले नाते अधिक दृढ होईल. वैवाहिक जीवनात आपल्या तणावामुळे परिस्थिती काहीशी बिघडू शकते, अन्यथा हा आठवडा वैवाहिक जीवनासाठी चांगलाच आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
मिथुन -हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. ह्या आठवड्यात आपण अत्यंत रोमँटिक असल्याचे दिसून येईल. आपल्या प्रणयी जीवनात आपण खूप मजा कराल. आपल्यात प्रेमालाप होईल. एकमेकांच्या सहवासात भरपूर वेळ घालवू शकाल. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी महागडे घड्याळ घेऊ शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली तरी आपल्या वैवाहिक जोडीदारास एखादे आजारपण येण्याची शक्यता असल्याने आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. आपली स्वतःची प्रकृती चांगली राहील. कुटुंबातील आपल्या वाढत्या हस्तक्षेपामुळे कौटुंबिक वातावरण गढूळ होऊन वाद वाढू शकतात. मार्केटिंगशी संबंधित जातकांसाठी हा आठवडा खूप मोठा फायदा मिळवून देणारा आहे. आपले लक्ष्यांक वेळेपूर्वी पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना एखादा मोठा सौदा झाल्याने खूप आनंद होईल. आपणास कार्यात यश प्राप्तीसाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील.
कर्क -आठवड्याच्या सुरवातीस आपण नात्यांना अधिक महत्व द्याल. संततीशी संबंधित एखादी समस्या असल्यास त्याचे निराकरण होण्याची संभावना आहे. जस जसे दिवस पुढे सरतील तस तसा आपल्या प्रेमाचा मोह भंग होऊ लागेल. आठवड्याचा उत्तरार्ध आपल्यासाठी काहीसा कठीण असल्याचे दिसत आहे. ह्या दरम्यान आपल्या ऊर्जेचे स्तर कमी होईल. तसेच सतत प्रकृतीत होणाऱ्या बदलामुळे आपण चिंतीत व्हाल. कामाच्या ठिकाणी अनेकदा आपल्या उग्रतेमुळे वादाची ठिणगी पडू शकते. ह्या आठवड्यात कोणत्याही प्रकारे नवीन संधी मिळण्याची संभावना कमी असल्याचे दिसत आहे. आठवड्याच्या अखेरीस आपली आर्थिक स्थिती डळमळीत होण्याची शक्यता असून आपणास अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. आपणास आर्थिक देवाण - घेवाण करताना अत्यंत सावध राहावे लागेल. धीर धरूनच आपण अवघड परिस्थितीतून बाहेर पडू शकाल.
सिंह -हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. आपल्यात भरपूर आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आपल्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या कडून ऊर्जा प्राप्त करेल. संपत्तीशी संबंधित कामात चांगला लाभ होईल. आपण एखादी नवीन संपत्ती बनवू शकाल किंवा खरेदी करू शकाल. कोर्ट - कचेरीतील कामात यश प्राप्त होईल. आपण विरोधकांवर मात करू शकाल. व्यापारात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या जातकांची त्यांच्या कौशल्यामुळे चांगली कामगिरी होऊ शकेल. कुटुंबात एखादे शुभ कार्य होईल. एखाद्या व्यक्तीच्या विवाहाची तयारी संभवते. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला असून आपण आपल्या प्रिय व्यक्तीची कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी ओळख करून देऊ शकाल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आपल्या प्रिय व्यक्तीस प्राप्त होऊ शकेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपणास सासुरवाडी कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल.
कन्या -हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीसच आपणास एखादा मोठा लाभ संभवतो. व्यापारात आपल्या योजना गती घेतील व त्याचे परिणाम आपणास अनुकूल असतील. त्यामुळे आपले आत्मबल वाढेल. आपल्या पैकी काहीजण परदेशात जाण्यात यशस्वी होतील. तसेच त्यांच्या काही योजना यशस्वी होतील. परदेशातील कामगिरी उत्तम होईल. काही जातक परदेशी सरकारच्या सहकार्याने कामे करून आपले जीवन उंचावतील. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी अनुकूल आहे. चांगले संपर्क असल्याने व्यापारात सुद्धा लाभ होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्यच आहे. आपली प्रिय व्यक्ती सतत आपले लक्ष वेधून घेईल. विवाहितांना काळजी करण्या सारखे काही नाही. नात्यात रोमांस राहील. एकमेकांप्रती आपण आकर्षित झाल्याने आपल्यातील जवळीक वाढेल. सासुरवाडी कडील लोकांच्या सहवासात प्रवास करण्याची संधी मिळेल.