महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : 'या' राशींच्या लोकांना आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल; वाचा, साप्ताहिक राशीभविष्य - HOROSCOPE FOR THE WEEK 22 TO 28 January

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य . 22 ते 28 जानेवारी 2023

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य

By

Published : Jan 22, 2023, 12:16 AM IST

मेष : ह्या आठवड्यात आपणास थोडे सावध होण्याची गरज आहे. विवाहित व्यक्ती आपल्या दांपत्य जीवनात काहीसे चिंतातुर असतील. अशा परिस्थितीत ते एखाद्याचा सल्ला घेऊ शकतात. मात्र, कोणाचाही सल्ला घेताना थोडे सतर्क राहावे. कामाच्या भारामुळे प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनाकडे विशेष लक्ष देऊ शकणार नाहीत, व त्यामुळे त्यांच्या प्रणयी जीवनात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या कामावर जास्त लक्ष द्याल. त्यामुळे कामातील धावपळ दूर होईल. एकदा कामात जम बसल्यावर आपणास आर्थिक दृष्ट्या मागे वळून बघावे लागणार नाही. मात्र, त्यासाठी आपणास प्रयत्नशील राहावे लागेल. आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्यास शिका, अन्यथा आर्थिक घडी विस्कटण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी ग्रहमान विशेष अनुकूल नसल्याने मेहनतीस दुसरा पर्याय नाही. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहारावर लक्ष द्यावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आठवड्याच्या अखेरच्या दोन दिवसात आपणास एखादी खुश खबर मिळेल.

वृषभ :हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण दूरवरचा प्रवास करू शकाल. त्यामुळे आपण आनंदित व्हाल. मित्रांच्या सहवासात मौजमजा करण्याची संधी मिळेल. काही नवीन मैत्री सुद्धा होऊ शकते. विवाहितांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. प्रणयी जीवन सुद्धा सुखद असेल. कामा निमित्त केलेले प्रवास यशस्वी होतील. आपण आपल्या कामात खूप मेहनत कराल. त्यामुळे आपणास थकवा जाणवून आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे, तेव्हा काळजी घ्यावी. कोणतेही नियमबाह्य काम करू नका, अन्यथा शासन - प्रशासना कडून कठोर सजा सुद्धा होऊ शकते. व्यापाऱ्यांना आपल्या संपर्कांचा लाभ मिळेल. तसेच ते आपल्या मेहनतीने यश प्राप्त करू शकतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात एकाग्रचित्त झाल्याने ते त्यात यशस्वी सुद्धा होतील. ह्या आठवड्यात आपणास थकवा जाणवू शकतो. ह्या व्यतिरिक्त डाव्या डोळ्यास त्रास संभवतो. तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मिथुन :आठवड्याच्या सुरवातीस आपणास काही त्रास होऊ शकतो. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊन आपल्या वैवाहिक जीवनात चैतन्य निर्माण करू शकतील. प्रेमीजनांना मात्र काहीसा त्रास सहन करावा लागेल. आपल्यात जवळीक वाढली तरी सुद्धा नात्यात काही तणाव वाढण्याची संभावना आहे. नोकरीवर आपली भिस्त असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करा. त्याचे मिळणारे चांगले परिणाम आपणास खुश करतील. व्यापारी आपल्या व्यापार वृद्धीसाठी काही नातेवाईकांच्या मदतीची अपेक्षा बागळतील. आपण आपल्या सासुरवाडी कडील लोकांच्या मदतीने सुद्धा प्रगती करू शकाल. मात्र, सासुरवाडी कडील एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक तक्रारीने आपण त्रासून जाल. एखाद्या गोष्टीने आपण गंभीर व्हाल. ह्याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर होऊन आपले आरोग्य अधिक बिघडू शकते. तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचा पहिला दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क : आठवड्याची सुरवात आशास्पद असली तरी आठवड्याचे मधले दिवस आव्हानात्मक असतील. वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्यच आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपल्या कामाची प्रशंसा सुद्धा केली जाईल. आपणास आपल्या कष्टांचे यथायोग्य फळ मिळेल. आपण खूप खुश व्हाल. व्यापाऱ्यांना शासकीय विभागातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची संभावना आहे. मात्र, एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून काही केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. फक्त विश्वासू व्यक्तीशीच बोलणी करावीत. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांना आपल्या मेहनीताचे चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा एखादा मोठा आजार होण्याची संभावना आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

सिंह: हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनातील तणाव कमी होत असल्याचे जाणवेल. त्याच बरोबर नात्यातील प्रेम व रोमांस वृद्धिंगत होईल. प्रेमीजनांना त्यांच्या जीवनात चढ - उतार येत असल्याचे जाणवेल. परंतु आपण आपल्या प्रिय व्यक्तीसह एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. काही समस्या आल्या तरी सुद्धा आपला व्यापार जलद गतीने प्रगती करेल. आपण पूर्वी जे प्रयत्न केले होते त्यांचे फळ आता आपणास मिळू लागेल. आपल्या व्यापारास स्थैर्य येऊन मोठ मोठाल्या ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे आपली स्थिती अधिक मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. त्यांची सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्री स्थिती मजबूत होईल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. ते मन लावून अभ्यास करतील. वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास केल्यास त्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश प्राप्त होऊ शकेल. ह्या आठवड्यात मानसिक तणाव व शारीरिक समस्या आपणास त्रास देतील. त्यामुळे प्रकृतीत बिघाड होऊन कामाच्या ठिकाणी समस्या होण्याची संभावना आहे. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्या : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा उपभोग घेऊ शकतील. जोडीदाराच्या कुटुंबियांशी सुद्धा सलोख्याचे संबंध राहतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा चांगला आहे. आधीपासून असलेल्या समस्या निवळू लागतील. ह्या आठवड्यात खर्चात वाढ झाल्याने आपल्या चिंतेत भर पडेल. प्राप्ती सामान्यच राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. ते आपल्या कौशल्याचा चांगला वापर करू शकतील. व्यापारात सुद्धा आपली तुतारी वाजत राहील. आपणास नशिबाची साथ सुद्धा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशदायी आहे. मेहनत केल्यास एखाद्या स्पर्धेत यशस्वी होता येईल. आठवड्याच्या मध्यास मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीने आपण चिंतीत व्हाल. तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे.

तूळ : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील तणाव दूर सारून मार्गक्रमण करतील. जोडीदाराशी उत्तम समन्वय साधण्याचा प्रयत्न करतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. प्रिय व्यक्तीस आपल्या कुटुंबियांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास घेऊन जाऊ शकाल. तिला आपल्या कुटुंबात समाविष्ट करण्याचा प्रयत्न कराल. त्यास काही विरोध झाला तरी नंतर स्थिती आपणास अनुकूल होईल. कार्यात यशस्वी झाल्यामुळे मनात आनंदाची भावना निर्माण होईल, परंतु आपणास एकटेपणा जाणवत राहील. ह्या एकटेपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा, अन्यथा एखादी महत्वाची संधी आपल्या हातून निसटून जाईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मेहनतीचे यथायोग्य फळ मिळेल. कामात दृढता येईल. व्यापारी आपल्या कौशल्याच्या जोरावर व्यापारातील स्थिती मजबूत करू शकतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. काही अडथळे आले तरी ते मेहनत करून इच्छित परिणाम मिळवू शकतील. सध्या आपले आरोग्य उत्तम राहील. कोणतीही मोठी समस्या उदभवेल असे दिसत नसले तरी आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या मित्रांसह खूप मौजमजा करत असल्याचे दिसून येईल. एखादा लहान - सहान प्रवास सुद्धा करू शकाल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल. भावंडांशी सामंजस्य राहील. कौटुंबिक जीवनात माता - पित्यांचा आशीर्वाद व सहकार्य मिळाल्याने अनेक कामे सहजपणे होऊ लागतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. नात्यात सलोखा निर्माण झाल्याने आपण एकमेकांच्या सहवासात वेळ घालविण्याची कोणतीही संधी वाया घालवणार नाही. काहीशा तणावाच्या वातावरणात विवाहितांचे वैवाहिक जीवन मार्गक्रमण करेल. आपण समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न कराल. आपल्यात आपुलकी असल्याचे दिसून येईल. व्यापारास गती येईल. काही फायदेशीर सौदे आपल्या नजरेस येतील, ज्यात गुंतवणूक करून आपण प्रगती करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा सामान्यच राहील. आपले प्रयत्न यशस्वी होतील. कार्यात यश प्राप्त झाल्याने मन आनंदित होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. मेहनत केल्यास स्पर्धेत सुद्धा यशस्वी होता येईल. ह्या आठवड्यात आपल्या आरोग्यात सुधारणा होईल. असे असले तरी घसा किंवा खांदा यांच्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनू : हा आठवडा आपल्यासाठी उन्नतीदायक आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखावह होईल. जोडीदाराशी माधुर्य वाढून नात्यातील प्रेम वाढेल. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. प्रणयी जीवनातील तणाव निवळू लागतील. आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी एखादी चांगली भेटवस्तू आणाल, ज्याने ती खुश होईल. आपणास आपला आळस झटकावा लागेल, अन्यथा कामात विलंब होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामाच्या बाबतीत काहीसे बेचैनी जाणवेल. आपल्या आळसामुळे काही महत्वाच्या संधी हातून निसटून जातील. अजून हि आपण जागरूक झालात तर काही त्रास होणार नाही. व्यापारासाठी आठवडा फायदेशीर आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. त्यामुळे ते खुश होतील. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

मकर :हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन ठीक राहील. कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका. प्रणयी जीवनासाठी आठवडा नाजूक आहे. तेव्हा सावध राहा. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल, त्यामुळे कामात यश प्राप्त होईल. व्यापारात प्रगती होईल. आपल्या योजना प्रत्यक्षात येतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपली कामे लक्षपूर्वक केल्यासच लाभ होईल. तेव्हा आता कंबर कसून कामास लागावे. अन्यथा समस्या वाढू शकतात. नशिबाची साथ मिळाल्याने आपली काही कामे आपोआपच होतील. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामासाठी संवाद कौशल्य सुधारण्यावर भर देतील. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा दबाव राहील.

कुंभ :हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. ते जोडीने एखाद्या ठिकाणी फिरावयास सुद्धा जाऊ शकतील. प्रेमीजन ह्या आठवड्यात काहीसे रोमँटिक झाल्याचे दिसून येईल. परंतु आपल्या प्रिय व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा एखादी समस्या निर्माण होऊ शकते. आठवड्याच्या सुरवातीस एखादा मोठा खर्च आपणास करावा लागेल. आपण आपल्या आनंदासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकाल. वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. ह्या व्यतिरिक्त एखाद्या जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत सुद्धा यश प्राप्त होऊ शकते. त्याने आपणास संपत्तीची प्राप्ती होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. व्यापारासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. व्यापारात आपण यशस्वी होऊ शकाल. आपणास प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास यश सुद्धा प्राप्त होईल. ह्या आठवड्यात प्रकृतीत चढ - उतार येतील, तेव्हा काळजी घ्यावी.

मीन : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात उत्तम समन्वय राहिल्याचा त्यांना फायदा होईल. जोडीदाराशी आपलेपणा राहील. जोडीदाराच्या सहकार्याने काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जोडीदारास कामात मदत सुद्धा करतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. थोडा अहंकार असल्याचे दिसून येईल, ज्यास दूर करण्याचा प्रयत्न करावा. सध्या आपली एखादी जुनी व मोठी इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे आपण खुश होऊन आपल्या आनंदात इतरांना सुद्धा सामील कराल. लोकांना मिठाई खाऊ घालाल. प्राप्तीत मोठी वाढ होताना दिसून येईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यापाराशी संबंधित एखादे काम खोळंबले असेल तर ते पूर्णत्वास जाईल. नोकरीत स्थिती आपणास अनुकूल राहील. आपणास आपल्या बुद्धिमत्तेचा लाभ होईल. व्यापाऱ्यांना आपल्या कष्टाचे पूर्ण फळ प्राप्त होईल. प्रगतीची संधी सुद्धा मिळेल. परेदशात जाण्यासाठी आपण सक्षम असाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. असे असले तरी लक्ष इतरत्र भटकण्याची शक्यता असल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांना देण्यात येत आहे. सध्या कोणतीही शारीरिक समस्या उदभवेल असे दिसत नसले तरी एखादे लहान - सहान दुखणे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details