मेषहा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपण आत्मविश्वासाने कामे कराल. त्यामुळे आपणास कोणत्याही मोठ्या आव्हानांस सामोरे जावे लागणार नाही. नोकरी - व्यवसायात हाच आत्मविश्वास आपणास इतरांच्या पुढे नेऊन ठेवेल. त्यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण होईल. आपल्या खर्चात थोडी वाढ होण्याची शक्यता असल्याने आपण सावध राहून आर्थिक नियोजन करावे. प्राप्तीत सामान्य वाढ होईल. आपण काही नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा करू शकाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा रोमांस करण्याचा असून ते आपल्या संबंधात पुढे जाऊ शकतील. विवाहितांना त्यांची वैवाहिक जोडीदार प्रेमिके प्रमाणे प्रेम करेल, जे आपणास आवडेल. आपली प्रकृती उत्तम राहील. आठवड्याचा सुरवातीचा व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.
वृषभहा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस पैश्यांची आवक उत्तम होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपण आपले बँक बॅलेन्स वाढविण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबियांच्या गरजांकडे सुद्धा लक्ष द्याल. आपण कुटुंबियांसाठी एखादे असे काम कराल, कि ज्यामुळे ते खूप आनंदित होतील. आठवड्याचे मधले दिवस छोट्या प्रवासासाठी अनुकूल आहेत. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्यास प्राधान्य द्याल. आपल्या आई प्रती आपले प्रेम वाढेल. कुटुंबातील आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. त्यामुळे आपण खुश व्हाल. आपली प्रकृती सुद्धा चांगली राहील. प्रणयी जीवन प्रेमाने भरलेले असेल. आपल्या प्रेमिकेस खुश करण्यासाठी आपण तिला एखादा सुंदर ड्रेस भेट देऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. नोकरी करणाऱ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थी आपला अभ्यास सहजपणे करू शकतील. त्यामुळे त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
मिथुनहा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास आपली एखादी संपत्ती विकून थोडा लाभ होऊ शकेल. त्यामुळे आपणास चांगली प्राप्ती सुद्धा होऊ शकेल. आता आपणास आपल्या व्यवसायात नवीन काहीतरी करण्याचा विचार करावा लागेल. नोकरी करणाऱ्यांना शासना कडून एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. आपण आपल्या कामात प्रगती करू शकाल. वरिष्ठ आपली प्रशंसा करतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. परस्पर समजूतदारपणा वैवाहिक जीवन सुखद करण्यास मदतरूप होईल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या संबंधांचा आनंद घेऊ शकाल. प्रेमिकेसह फिरावयास जाऊ शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत वाढवावी लागेल. एकाच वेळी अनेक विषयांचा अभ्यास करून ते चांगले परिणाम मिळवू शकतील. आपली प्रकृती चांगली राहिली तरी सुद्धा ताप येण्याची शक्यता असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कर्कहा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या खर्चात थोडी वाढ होईल, जी आठवड्याच्या मध्या पर्यंत राहील. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. योग्य वेळी आपण कामे पूर्ण करू शकाल, त्यामुळे आपल्या वेळेची बचत होईल. हा वाचलेला वेळ आपण इतर चांगल्या कार्यासाठी वापरू शकाल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारात प्रगती करण्यासाठी काही नवीन लोकांचे सहकार्य घ्यावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात दृढपणे प्रगती करू शकतील. आपली कार्यक्षमता आपणास अग्रस्थानी ठेवेल. शासना कडून सुद्धा एखादा लाभ संभवतो. काहीजणांना सरकारी नोकरी मिळण्याची संभावना आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थी आपल्या अभ्यासात व्यस्त राहतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
सिंहहा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस प्राप्तीत जलदगतीने वाढ झाल्याने आपले मन प्रसन्न होईल. आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ होण्याची संभावना असली तरी आठवड्याची अखेर खूपच सुखद होईल. आपण प्रेमिकेच्या सहवासात जास्त वेळ घालवू शकाल. आपणास तिच्यासह फिरावयास जाण्याची व मजा करण्याची संधी मिळेल. आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. आपण खूपच आकर्षक व्हाल. लोक आपल्याकडे आकर्षित होतील. कुटुंबात एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल. नोकरी करणाऱ्यांच्या कामात तटस्थता येईल. व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. काही तांत्रिक समस्या आपणास व्यथित करू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन खूपच सुखद होईल. आपण आपल्या संबंधांचा मोकळेपणाने आनंद घेऊ शकाल. संबंधात आकर्षणा बरोबरच रोमांस व सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल असल्याने सावध राहावे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कन्याहा आठवडा आपल्यासाठी नवीन आशा निर्माण करणारा आहे. आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर आपण कामात प्रगती करू शकाल. आपणास शासना कडून एखादा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. व्यापार जलदगतीने प्रगती करेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामे काळजीपूर्वक करतील. ते कामाची यादी तयार करून कामे व्यवस्थितपणे पूर्ण करतील. असे करून ते आपला बहुतांश वेळ वाचवून इतर कामे सुद्धा करू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या संबंधांना योग्य प्रमाणात वेळ देऊन मोकळेपणाने त्याचा आनंद घेऊ शकाल. प्रेमीजन आव्हानांचा सामना करून आपले प्रणयी जीवन सुखद करू शकतील. ते आपल्या प्रेमिकेचे हृदय जिंकू शकतील. त्यांच्यातील समस्या संपुष्टात आल्याने ते आपल्या प्रणयी जीवनास पुढे नेऊ शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात सुखद परिणाम मिळतील. त्यांनी आपली मेहनत चालूच ठेवावी. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल असला तरी अखेरच्या दिवसात लांब पल्ल्याचा प्रवास करणे टाळावे.