मेष -हा आठवडा आपणास चांगली फले देणारा आहे. असे असले तरी एखाद्या बाबतीत आपणास अपमान सहन करावा लागणार असल्याने आपला स्वाभिमान दुखावणार नाही ह्याची काळजी घ्यावी. आपल्या वडिलांशी आपले मतभेद होण्याची शक्यता असल्याने त्यांची व त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक तणावाचा प्रभाव आपल्या कामावर होताना सुद्धा दिसून येईल. नोकरीत आपले मन रमणार नाही व त्यामुळे आपली कामगिरी चांगली होऊ शकणार नाही. आपल्या हातून कामात काही चूका होतील. व्यापाऱ्यांना आयात - निर्यातीतून चांगला फायदा होईल. परदेशाशी केलेले व्यवहार लाभदायी ठरतील. प्रणयी जीवनात रोमांस वाढेल. आपल्या प्रियव्यक्तीसह बाहेर फिरावयास जाण्याची संधी मिळेल. विवाहितांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. जोडीदारासह नवीन काही करण्याची संधी मिळेल. आपली प्रकृती उत्तम राहील.
वृषभ -हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण काहीसे चिंतातुर असाल. ह्या चिंतेमुळे आपणास मानसिक थकवा जाणवेल, तेव्हा चिंतामुक्त होण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक वातावरण सुखद असेल. कुटुंबासाठी आपण नवीन टी. व्ही., फ्रिज किंवा ओव्हन खरेदी करू शकाल. कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या विवाहाची तयारी सुद्धा जोरात चालू राहील. वैवाहिक जीवनात प्रेम वृद्धिंगत होईल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. नोकरीच्या निमित्ताने आपणास काही नवीन लोकां बरोबर काम करण्याची संधी मिळेल. त्यांच्या कामामुळे आपण प्रभावित व्हाल. ह्या दरम्यान आपण आपली ओळख निर्माण करू शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपले काम कमीत कमी वेळात पूर्ण होईल अशा पद्धतीने आपल्या कामाचे वेळापत्रक बनवाल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आपणास प्रत्येक कामात यश प्राप्त होईल.
मिथुन -हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. आठवड्याची सुरवात काहीशी नाजूकच असेल. आपणास चिंतामुक्त होण्याचा मार्ग शोधावा लागेल. मानसिक ताणाचा प्रभाव आपल्या प्रत्येक कामावर होताना दिसून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी मात्र चांगली होईल. आपण सनदशीर मार्गाने कामे करण्यास प्राधान्य द्याल व त्यामुळे आपणास विरोधाचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. कुटुंबातील लहान व्यक्तींचे प्रेम व स्नेह प्राप्त होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी उत्तम आहे. विवाहितांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत वाढ व खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपले आरोग्य उत्तम राहिले तरी आपल्या खाण्या - पिण्यावर आपण लक्ष न दिल्याने काही त्रास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आपले जुने मित्र, नातेवाईक व शेजाऱ्यांच्या सहवासात आपण आनंदित व्हाल. त्यांच्यामुळे आपल्या चेहेऱ्यावर हास्य उमटेल.
कर्क -आठवड्याच्या सुरवातीस आपणास कौटुंबिक गोष्टींसाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागू शकते. आपण व्यावसायिक गोष्टींवर अधिक लक्ष द्याल. नोकरी करणाऱ्या जातकांना उपलब्ध परिस्थितीत काम करणे लाभदायी ठरेल. प्रणयी जीवनात आपण अधिक संवेदनशील व्हाल. आठवड्याच्या अखेरीस आपल्या प्रिय व्यक्तीच्या किंवा वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आठवड्याच्या मध्यास कामाच्या व्यस्ततेमुळे विश्रांतीसाठी वेळ मिळणे दुर्लभ होऊ शकते. असे असले तरी ह्या दरम्यान आपला उत्साह व ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपणास आहार व विश्रांती ह्यासाठी अधिक जागरूक राहावे लागेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपले व्यावसायिक संपर्क वाढतील. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित झाले तरी अखेरच्या दिवसात निराशा पदरी पडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या आठवड्यात रक्तदाबाशी संबंधित समस्या संभवते.
सिंह -हा आठवडा आपल्या मनात नवीन उत्साह निर्माण करणारा आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनात उत्साहपूर्वक वाटचाल कराल. आपल्या मनातील प्रेम व स्नेह भावना उफाळून येईल. वैवाहिक जीवनात रोमांस वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला आहे. आपण बराच वेळ आपल्या प्रिय व्यक्तीशी फोनवर संवाद साधू शकाल. आपल्या प्रिय व्यक्तीस आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी खूप वेळ घ्याल. आपल्या खर्चात वाढ होईल. आपण ह्या अगोदर जर सरकार विरुद्ध काही कार्य केले असेल तर ह्या आठवड्यात त्याची शिक्षा भोगावी लागू शकते. नोकरीत आपली कामगिरी चांगली होईल. आपल्या कष्टांचे चीज होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपल्या व्यवसायात कोणीही आपल्याशी स्पर्धा करू शकणार नसल्याने आपण प्रगती साधू शकाल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल.
कन्या -हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांच्या अध्ययनात एखादी चिंता निर्माण होईल व त्यामुळे त्यांना अधिक एकाग्रतेने अध्ययन करावे लागेल. प्रेमीजनांना काही समस्यांचा सामना करावा लागेल. अशा परिस्थितीत शांत राहिल्यास समस्यांचे निराकरण होऊ शकेल. विवाहितांच्या जीवनात रोमांस वाढला तरी काही जातक विवाहबाह्य संबंधांकडे आकर्षित होतील. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आपण जीवनाचा खरा आनंद उपभोगू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी उत्तम होईल. व्यापाऱ्यांना नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. व्यापाराच्या बाबतीत आपण आपल्या योजनां बद्धल नवीन लोकांशी चर्चा कराल. मात्र, प्रत्येक व्यक्तीवर विश्वास न ठेवण्याची खबरदारी घ्यावी. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.