मेष :विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढउतार येत असल्याचे या आठवड्यात दिसून येईल. आपल्या जोडीदारास आपल्याकडून चांगला पाठिंबा मिळेल. या आठवड्यात आपली प्रेमिका एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरावयास किंवा काही कामानिमित्त बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपणास आपल्या प्रेमिकेस भेटण्याची संधी मिळणार नसल्याने आपण काहीसे त्रासून जाल. या आठवड्यात आपण आपल्या व्यापाराच्या बाबतीत अत्यंत कार्यरत राहाल. आपल्या व्यापारात प्रगती करण्यास उपयुक्त ठरतील अशा काही नवीन लोकांच्या संपर्कात आपण याल. या आठवड्यात परिस्थितीत सुधारणा झाली तरी काही नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामे व्यवस्थितपणे पूर्ण करू शकतील. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावेल व कामाच्या ठिकाणी त्यांची स्थिती मजबूत होईल. या आठवड्यात विद्यार्थ्यांना आपल्या अध्ययनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करणे त्यांच्या हिताचे होईल. या आठवड्यात आपण ताप व डोकेदुःखीपासून पीडित होण्याची शक्यता आहे. अशावेळी आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
वृषभ :हा आठवडा आपल्यासाठी चांगला असून विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात रोमांस अनुभवू शकतील. तसेच जोडीदाराशी एखाद्या नवीन व्यवसायाविषयी चर्चा सुद्धा करू शकतील. प्रेमीजनांसाठी मात्र हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपली प्रेमिका काही कारणाने शहराच्या बाहेर जाण्याची शक्यता असल्याने आपली भेट होण्याची शक्यता कमीच आहे. आपण आपल्या व्यापाराच्या बाबतीत खूप सक्रिय व्हाल व त्याचे उत्तम फळ आपणास मिळेल. काही नवीन लोकांकडून माहिती घेऊन आपण व्यापारात नवीन भागीदारी करू शकाल. त्यामुळे आपण आपल्या व्यापाराची वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. या आठवड्यात आपला मानसिक दबाव कमी होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नेत्र विकार किंवा पाय दुखण्याची समस्या त्रास देऊ शकते. आठवड्याचे अखेरचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी चांगला असून वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील. नात्यात रोमांस वाढून जोडीदार सुद्धा आपणास प्रेरित करेल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा चांगला असला तरी घृणात्मक वादविवाद टाळावेत. आपली या आठवड्याची सुरवात एखाद्या मोठ्या खर्चाने होईल. आपण दीर्घ काळापासून एखादे महागडे उपकरण खरेदी करू इच्छित होता, ते या आठवड्यात खरेदी कराल. अर्थात पैसा खर्च करून आपण ती वस्तू तर मिळवू शकाल, परंतु खर्च जास्त झाल्याने आपण त्यावर विचार करत बसाल. व्यापार व नोकरी या दोन्ही क्षेत्रांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपली कामगिरी रोजच्या रोज उंचावत जाईल व त्याचा लाभ सुद्धा आपणास होईल. कामानिमित्त थोडी धावपळ होईल. या आठवड्यात विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. अभ्यासात खूप मेहनत करुन अभ्यासासाठी ते काही काळ एकांतात घालविण्यास पसंती देतील. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. आरोग्य विषयक कोणतीही समस्या होताना दिसत नाही. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कर्क : हा आठवडा आपल्यासाठी चांगला असून तुम्ही तुमच्या प्रणयी जीवनात अत्यंत खुश असल्याचे दिसून येईल. सध्या आपल्या नात्यात रोमांस, कृतिशीलता, प्रेम, प्रणय इत्यादी सर्व काही असल्याचे दिसून येईल, व आपण एखाद्या चित्रपटाप्रमाणे आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. आपल्या प्रेमिकेसह एखाद्या ठिकाणी फिरावयास सुद्धा जाऊ शकाल. एखाद्या रम्य ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत सुद्धा या आठवड्यात आखू शकता. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील समस्या कमी होऊन एकमेकातील सामंजस्य सुद्धा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती उत्तम असेल. आपल्या कार्यकौशल्याचा आपणास चांगला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी आपली स्थिती मजबूत होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपणास थोडी जोखीम घेण्याची आवश्यकता भासू शकते, जी आपल्या व्यापार वृद्धीसाठी आवश्यक नसेल सुद्धा. कौटुंबिक जीवनात आपण समाधानी असाल. आपण आपल्या कामातील धावपळीमुळे कुटुंबियांपासून थोडे दूर राहाल. हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करावा. या आठवड्यात आरोग्य विषयक कोणताही त्रास होताना दिसत नसला तरी आपणास आपल्या आहारावर लक्ष ठेवावे लागेल. आठवड्याचा पहिला व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.
सिंह :हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी असून वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील. आपण एकमेकांना समजून घ्याल व घराची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न कराल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा तणावग्रस्त आहे. आपल्यात भांडण होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास वरिष्ठांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या माध्यमातून आपण एखादे चांगले पद प्राप्त करू शकाल. हा आठवडा दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल आहे. एखादे मोठे काम आपण हाती घ्याल, जे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सामान्यच आहे. या आठवड्यात आपली प्रकृती बिघडू शकते. तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कन्या :या आठवड्यात आपणास प्रगती करण्याबरोबरच सामंजस्य दाखविण्याची संधी सुद्धा मिळेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. त्यांना जोडीदाराच्या पाठिंब्यासह प्रेम व आपुलकी सुद्धा मिळेल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्यच आहे. आपल्या प्रेमिकेस समजून घेण्याचा प्रयत्न करण्याची सुद्धा आवश्यकता असते. त्याकडे लक्ष द्यावे. सध्या आपणास आपल्या आर्थिक स्थितीकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. विचार न करता कोणालाही पैसे देऊ नये, अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. या आठवड्यात कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यातील मजकूर समजून घ्यावा, अन्यथा एखादी समस्या उदभवू शकते. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकता. नोकरी करणाऱ्यांच्या हातून चूक होण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहून कामे करावीत. या आठवड्यात व्यापाऱ्यांची स्थिती उत्तम असेल. आपण व्यापारात घट्ट पाय रोवून बसाल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा पाठिंबा आपणास मिळेल. कुटुंबीय सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहू शकतील. विद्यार्थ्यांना या आठवड्यात आपली मेहनत वाढवावी लागेल. त्यांना त्यांच्या मेहनतीचे यथायोग्य परिणाम मिळतील. असे असले तरी आर्किटेक्चर व फाईन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा जास्त अनुकूल आहे. या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागेल, अन्यथा आपण आजारी पडू शकता. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.