मेष : आठवड्याच्या सुरवातीस कुटुंब व घरगुती खर्चांवर लक्ष द्यावे लागेल. आपल्या माते बद्धल प्रेम वाढेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात अधिक वेळ घालवाल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. घरासाठी एखादी नवीन वस्तू खरेदी कराल. प्राप्तीत वाढ होईल. जमीन - जुमल्याशी संबंधीत बाबीत लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात जास्त मेहनत करतील, ज्याचे त्यांना चांगले परिणाम मिळतील. वरिष्ठांशी संभाव्य वाद टाळावे लागतील. ह्या आठवड्यात खर्च वाढतील, परंतु प्राप्ती सुद्धा ठीक - ठीक होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी अनुकूल आहे. त्यांना नवीन काही करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी आपल्या अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. मेहनत करून ते आपल्या विषयांवर पकड मजबूत करतील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला आहे. जुन्या विकारांत दिलासा मिळेल.
मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील तणाव कमी करण्यात यशस्वी होऊन एक उत्तम वैवाहिक जीवन व्यतीत करतील. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी चढ - उतारांचा आहे. आपल्या प्रियव्यक्तीशी आपले वाद होण्याची संभावना आहे. त्यामुळे नात्यात काहीसा तणाव निर्माण होईल. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास करू शकाल. मित्रांच्या सहकार्याने कामात यश प्राप्त होईल. एखाद्या विशेष शेजाऱ्याप्रती आकर्षित होऊ शकाल. प्राप्तीत वाढ व खर्चात कपात होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपले कष्ट व कार्यकौशल्य आपल्यासाठी यशदायी ठरतील. व्यापाऱ्यांना आपल्या कष्टांचे चांगले फल प्राप्त होईल. चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आपण बाळगू शकता. विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या बाबतीत काहीसे गंभीर होतील, ज्याचा त्यांना फायदा होईल. आरोग्याचा विचार केल्यास कोणतीही गंभीर समस्या दिसत नसली तरी आपल्या दिनचर्येत नियमितता टिकवून ठेवावी. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
कर्क : हा आठवडा आपल्यासाठी खूपच अनुकूल आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात लहान - सहान समस्या आल्या तरी त्यांचे नाते दृढच राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगलाच आहे. प्रणयात आपण घाई केल्यास ते आपल्यासाठी योग्य ठरणारे नसले तरी नात्यातील रोमांस टिकून राहील. त्यामुळे आपण आपले नाते जपू शकाल. कार्यात यश प्राप्ती होईल. आपला आत्मविश्वास सुद्धा दृढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच फायदेशीर ठरणारा आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर आपली स्थिती मजबूत होईल. आपल्या शब्दांना वजन राहील व त्यामुळे कोणीही आपल्या वक्तव्यास विरोध करणार नाही. आपण जर व्यापार करत असाल तर आपण व्यापार वृद्धीसाठी खूपच प्रयत्नशील राहाल. आपणास त्याचे सकारात्मक परिणाम मिळताना दिसेल व व्यापारात यश प्राप्ती होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूपच अनुकूल आहे. त्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. जुनाट आजारातू सुटका होऊ शकते. त्यामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
सिंह : ह्या आठवड्याच्या सुरवातीस आपल्या चिंता वाढण्याची संभावना आहे. परंतु नंतर परिस्थिती नियंत्रणात येईल. विवाहितांना आपल्या वैवाहिक नात्यात एकाच वेळेस सुख व दुःख अनुभवास येईल. समजूतदारपणा काहीसा कमी झाला तरी नात्यातील प्रेम टिकून राहील. प्रणयी जीवन उत्तम राहील. आपणास आपल्या प्रिय व्यक्तीचे पूर्ण सहकार्य मिळून आपण आपल्या जीवनात मार्गक्रमण कराल. सध्या आपले खर्च वाढतील, जे आपली आर्थिक स्थिती खालावू शकतील. तेव्हा खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपली कामगिरी लोकांच्या नजरेस येईल. व्यापाऱ्यांना दूरवरच्या क्षेत्रातून लाभ मिळेल. हा आठ्वडा विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला आहे. स्पर्धेत सुद्धा यश प्राप्त होईल. अभ्यासात सुद्धा चांगले यश मिळेल. ह्या आठवड्यात आरोग्यास कोणताही त्रास होताना दिसत नाही. तरी सुद्धा आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळल्यास उर्वरित दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कन्या : हा आठवडा आपल्यासाठी काही चांगल्या सूचना घेऊन येत आहे. कौटुंबिक वातावरण सकारात्मक तर स्थिती आनंदमय असेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात हा आठवडा अनुकूलता घेऊन येणारा आहे. आपल्या नात्यात प्रेम व परस्परात समजूतदारपणा वाढेल. संततीचे सौख्य प्राप्त होईल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा थोडा नाजूकच आहे. एकमेकात वाद संभवतो. तेव्हा सावध राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात जोर लावून ते उत्कृष्ट करून आपले त्रास दूर करतील. व्यापारातील प्रयत्न यशस्वी होतील. आपले कष्ट यशस्वी होऊन व्यापारास गती मिळेल. गुंतवणुकी पासून फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. मॅनेजमेंटचे विद्यार्थी उत्तम कामगिरी करू शकतील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला आहे. असे असले तरी आहारावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
तूळ :हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील. ते ह्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करताना दिसतील, ज्यात ते यशस्वी सुद्धा होतील. वैवाहिक जोडीदाराशी समन्वयात सुधारणा झाली तरी त्यांची उग्र भाषा आपणास त्रासदायक ठरू शकते. सासुरवाडीशी संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या प्रियव्यक्तीसाठी थोडा वेळ काढावा लागेल. कार्यक्षेत्री केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपण मनापासून मेहनत कराल व आपली कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी एक लक्ष्यांक ठरवून काम कराल. त्यामुळे आपणास नोकरीत चांगले परिणाम मिळतील. आपले वरिष्ठ सुद्धा आपणास सहकार्य करताना दिसतील. हा आठवडा व्यापारासाठी सुद्धा अनुकूल आहे. आपली महत्वाकांक्षा आपणास सतत पुढे जाण्यासाठी काही ना काही करण्यास प्रेरित करेल. त्यामुळे व्यापारात आपण काही नवीन प्रयोग सुद्धा कराल, जे यशस्वी होतील. विद्यार्थी खूप मेहनत करतील. मात्र कोणत्याही प्रकारे शॉर्टकट पद्धतीचा वापर करू नये. आरोग्यासाठी हा आठवडा चांगला आहे. सध्या आपण तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम कराल. त्यासाठी व्यायामशाळेत सुद्धा प्रवेश घेऊ शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. व्यक्तिगत जीवनासाठी हा आठवडा ठीक - ठीक आहे. प्रेमीजन आपल्या वेळेचा आनंद घेऊ शकतील. ते आपल्या प्रिय व्यक्तीसह एखाद्या मंदिरात दर्शनास जाऊ शकतील. तसेच त्यांच्याशी भविष्या विषयी बोलून आपल्या बद्धल त्यांच्या काय अपेक्षा आहेत याचा अंदाज घेऊ शकतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा अनुकूल आहे. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील, व त्यामुळे नाते सुद्धा दृढ होईल. आठवड्याच्या सुरवातीसच आपण एखादा प्रवास करू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. धार्मिक कार्यात मन गुंतेल. काही खर्च होतील जे आवश्यक कार्यासाठीच असतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपली मेहनत फलित झाल्याने आपली स्थिती उत्तम होऊ शकेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आपणास एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळू शकते. ह्या आठवड्यात प्रकृतीत सुधारणा होईल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. ते खूप मेहनत करतील. त्याचे चांगले परिणाम मिळताना दिसून येईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
धनु : हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. असे असले तरी आठवड्याच्या सुरवातीच्या दिवसात काही समस्या संभवतात. तेव्हा स्वतःला एकटे ठेवू नका व जास्त चिंता करू नका. एखादी समस्या असल्यास कुटुंबियांशी त्यावर चर्चा करा. कुटुंबात सुख - शांती नांदेल. कौटुंबिक वातावरण आपणास पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश राहतील. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा आनंददायक आहे. नोकरी असो किंवा व्यापार दोन्ही क्षेत्रात आपली कामगिरी वाखाणण्या जोगी होऊन आपली चांगली उन्नती होईल. विरोधकांवर आपण मात करू शकाल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. ते आपल्या अभ्यासात मागे राहणार नाहीत. ह्या आठवड्यात प्रकृतीची काळजी घेण्या सारखे काही नाही. असे असले तरी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे व दिनचर्येत नियमितता राखावी. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मकर : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची योजना आखू शकाल. आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. एकमेकांप्रती आकर्षण व रोमांस राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा काहीसा नाजूकच आहे. आपसात वाद होण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा दूरवरचा प्रवास करू शकाल. हा प्रवास आपल्या व्यापाराच्या निमित्ताने सुद्धा असू शकतो. त्याने आपला फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना आपली कामे मन लावून करावी लागतील. जर आपण मन लावून कामे केली नाहीत तर आपल्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. त्यांना आपली एकाग्रता वाढवावी लागेल. तरच ते यशस्वी होऊ शकतील. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असल्याने आपणास प्रकृतीची काळजी करावी लागणार नाही. एखादा जुनाट आजार सुद्धा बरा होऊ शकतो. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात रोमांस असला तरी त्याच बरोबर काही वाद सुद्धा संभवतात. त्यासाठी आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराशी संवाद साधावा लागेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपले संबंध दृढ होतील. आपली प्रियव्यक्ती आपणास तिच्या भावना व्यक्त करून सांगेल. आठवड्याच्या सुरवातीस काही खर्च व मानसिक तणावामुळे आपण त्रासून जाल. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपणास आठवड्याच्या अखेर पर्यंत वाट पाहावी लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या मेहनतीचे यथायोग्य फळ मिळेल व कार्यक्षेत्री आपली स्थिती मजबूत होईल. व्यापाऱ्यांना शासकीय निविदेचे काम मिळू शकते. सरकारी क्षेत्रातून सुद्धा काही लाभ संभवतात. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित कराल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मीन : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस अनुकूल आहेत. संतती सौख्य मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जोडीदाराशी आपला समन्वय चांगला असेल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा हा आठवडा रोमँटिक व कार्यशील राहील. आपण आपल्या प्रिय व्यक्तीवर मनापासून प्रेम करून तिला आपलेसे कराल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. थोड्याशा प्रयत्नाने सुद्धा चांगले यश प्राप्त होऊ शकते. व्यापारासाठी आठवडा मेहनत करण्याचा आहे. आता थोडीशी मेहनत केल्यास त्याचा आपणास भविष्यात लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. ते मन लावून अभ्यास करतील. त्याचा त्यांना फायदा सुद्धा होईल. आरोग्याच्या बाबतीत सध्या काही समस्या असल्याचे दिसत नसले तरी ऋतुजन्य विकार होणार नाहीत याची काळजी घावी लागेल. दिनचर्येत नियमितपणा राखल्यास त्रास होणार नाही. आठवड्याचा सुरवातीचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.