मेषहा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या मानसिक चिंता वाढण्याची दाट शक्यता आहे. कोणते काम आधी करावे व कोणते नंतर ह्या चिंतेने आपण व्यथित होण्याची संभावना आहे. त्यामुळे आपणास काही कामे अर्धवट सोडून द्यावी लागतील. असे झाल्याने आपले नुकसान होण्याची संभावना आहे. हि परिस्थिती टाळण्यासाठी कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना काम करण्याचा आनंद प्राप्त होईल. ते खूप मेहनत करतील. आपला नांवलौकिक व्हावा असे त्यांना वाटेल. हाच विचार त्यांच्या प्रगतीस कारणीभूत ठरेल. आपणास परदेशातून काही चांगले लाभ होण्याची शक्यता आहे. पूजा करण्यात आपण वेळ घालवू शकाल. प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेम व रोमांस यांचा वर्षाव होईल. आपल्या वैवाहिक जोडीदारामुळे आपणास काही लाभ होण्याची संभावना आहे. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन रोमांसमय असेल. आपली प्रेमिका आपल्या आवडीचे कपडे परिधान करून आपणास खुश करण्याचा प्रयत्न करेल. व्यापाऱ्यांना व्यापारात यश प्राप्त होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
वृषभहा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण चिंताग्रस्त असल्याचे पाहून आपले कुटुंबीय दुःखी होण्याची शक्यता आहे. परंतु, आपण चिंता करणे सोडून द्यावे. चिंता करून काहीच निष्पन्न होणार नाही. धीर धरून आपले मनोबल वाढवावे. आठवड्याच्या मध्यास खर्चात थोडी वाढ संभवते. प्राप्ती सामान्यच राहील. असे असून सुद्धा आपले कोणतेही काम खोळंबणार नाही. त्यामुळे आपण खुश व्हाल. पैश्यांच्या अभावामुळे कोणत्याही कामात अडथळा येणार नाही. व्यापाऱ्यांच्या व्यापारास तेजी येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपण आपली कामे नेहमीप्रमाणे कराल. लोक आपल्यावर खुश होतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असली तरी सुद्धा आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या मनातील गोष्ट समजून घेऊन त्यांना खुश कराल. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेशी मोकळेपणाने बोलू शकतील. परस्पर संवाद साधून एकमेकांची इच्छा समजू शकल्याने संबंध दृढ होतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना नवीन काही शिकावयास मिळेल.
मिथुनहा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपणास एखादी दुखापत होण्याची संभावना असल्याने काळजी घ्यावी. आपणास मानसिक त्रास संभवतो. खर्चात वाढ होईल. प्राप्ती सामान्य राहील, तेव्हा थोडी काळजी घ्यावी. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चिंता निर्माण होतील. त्यांना स्वतःच्या वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता सतावेल. प्रेमीजनांना एकमेकांचा विरोधाभास दूर करण्याचा प्रयत्न संयुक्तपणे करावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कुशाग्र बुद्धिमत्ता व ज्ञानाच्या जोरावर आपल्या कामात नैपुण्य मिळवतील. आपणास वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने कामात प्रगती साधण्यास मदत होईल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारात प्रगती करण्यासाठी स्वतःला बदलावे लागेल. आपणास शासनाकडून मोठा फायदा होऊ शकतो किंवा आपण एखादी सरकारी निविदा मिळवू शकाल. हा आठवडा प्रवासास प्रतिकूल आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल.
कर्कहा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या प्रणयी जीवना विषयी खूप चर्चा कराल. आपल्या प्रेमिकेचे गैरसमज दूर करण्यासाठी आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न कराल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. कौटुंबिक जवाबदारीत आपण अडकलात तरी सुद्धा एकमेकांप्रती आपले प्रेम वृद्धिंगत होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपणास खूप मोठा नफा होईल. पैश्यांची आवक वाढेल. आपणास विरोधकांपासून सावध राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना कामात यश प्राप्त होईल. कामात आपली प्रगती होईल. आपणास नशिबाची साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी आपली प्रशंसा सुद्धा होऊ शकते. आपण कामात नैपुण्य मिळवाल. ह्या आठवड्यात पदोन्नती संभवते. प्रकृती चांगली राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
सिंहहा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या योजना यशस्वी झाल्याने आपल्या प्राप्तीत वृद्धी होऊन आपला आत्मविश्वास सुद्धा द्विगुणित होईल. आपण कुटुंबासाठी एखादे असे पाऊल उचलाल कि ज्यामुळे कुटुंबियांच्या सुख - सोयीत सुद्धा वाढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात नैपुण्य मिळवतील. आपली काम करण्याची इच्छा सुद्धा प्रबळ होईल. आपल्या कामाची प्रशंसा सुद्धा होईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा मिश्र फलदायी आहे. आपल्या व्यापार विस्तारासाठी आपणास नवीन योजनांचा विचार करावा लागेल. विवाहितांसाठी हा आठवडा सामान्य फलदायी आहे. आपल्या संबंधात प्रेम व रोमांस असून सुद्धा आपल्या दोघांत घर्षण होण्याची संभावना आहे. प्रेमीजनांना सुखद परिणाम मिळतील. आपल्या वाणीत आकर्षण राहील. आपले व्यक्तिमत्व खुलून उठेल. ह्या आठवड्यात विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कन्याहा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच पैश्यांचा ओघ सुरु होऊन आपल्या प्राप्तीत वाढ होईल. खर्च कमी होतील. निर्धारित काम झाल्याने आपण खूपच खुश व्हाल, व त्यामुळे आपली हिंमत वाढेल. आपला आत्मविश्वास वाढल्याने आपण सर्व कामे नीट पारखून घेऊ शकाल. हाती काम घेण्या अगोदर त्याचे फायदे - तोटे ह्यांचा विचार कराल. त्यामुळे व्यवसायात आपण प्रगती सुद्धा करू शकाल. नोकरी करणाऱ्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल. प्रेमीजन आपल्या संबंधांच्या बाबतीत काहीसे निराश होण्याची शक्यता आहे. परंतु, काळजी करू नये. हि निराशा मात्र अल्प काळा पुरतीच मर्यादित असेल. आपल्या प्रेमिकेवर विश्वास ठेवावा. लवकरच आपल्या दोघात समेट होईल. विवाहितांसाठी हा आठवडा खूप चांगला असून ते आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगून खुश होतील. विद्यार्थी मनापासून मेहनत करून चांगले परिणाम मिळवू शकतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.