महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

26 नोव्हेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज आर्थिक लाभ होतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - 26 नोव्हेंबर राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य
आजचे राशीभविष्य

By

Published : Nov 26, 2021, 12:03 AM IST

मेष -चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण खूप संवेदनशील झाल्याने कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. आईच्या आरोग्याची काळजी राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्वाभिमान दुखावला जाईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्त्री वर्गापासून जपून राहावे लागेल.

वृषभ -चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसह प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. सार्वजनिक सन्मान मिळेल. व्यापारात वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.

मिथुन - चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. विद्यार्जनाच्या दृष्टीने विद्यार्थांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्नेही व मित्र परिवाराच्या भेटीने आनंद होईल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल राहील. उत्पन्नात वाढ होईल.

कर्क -चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज भावनांच्या प्रवाहात आपण मश्गुल व्हाल ज्यात कुटुंबीय व स्नेही, नातलग सहभागी होतील. भेट वस्तू मिळतील. स्वादिष्ट भोजन व बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. आनंददायक प्रवास होतील. धनलाभ होईल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल.

सिंह -चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपण कोर्ट - कचेरी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर व बेचैन असेल. आपले बोलणे व वर्तन ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. आपण आज हळवे व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. काही गैरसमज होऊन आपले नुकसान होण्याची शक्यता आहे.

कन्या -चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. वाडवडील व मित्र यांच्या सहवासात आपला दिवस आनंदात जाईल. प्रवास सुद्धा संभवतो. पत्नी व संतती ह्यांच्यासह वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. संतती कडून सुखद बातम्या समजतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल.

तूळ - चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपले घर व कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीची शक्यता आहे. वरिष्ठ आज आपल्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. मातुला कडून फायदा होईल. सरकारी कामात सफलता मिळेल.

वृश्चिक - चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास होईल. वरिष्ठ आज आपल्या कामगिरीवर नाखूष होतील. संततीशी मतभेद संभवतात. आज महत्वाची कामे स्थगित ठेवणे फायदेशीर ठरेल.

धनू - चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. एखादी शस्त्रक्रिया संभवते. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. अचानकपणे एखादा आजार सतावेल. खर्चात वाढ होईल. वाणी व वर्तणूक ह्यावर संयम ठेवावा.

मकर -चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस कामाचा व्याप व मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. आर्थिक लाभ व मान - सन्मान ह्यात वृद्धी होईल. स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास व एखादा प्रवास आपल्या आनंदात भर घालू शकेल.

कुंभ -चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस कामात यश मिळविण्यासाठी अनुकूल आहे. केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तन मनाला उत्साह जाणवेल. नोकरी - व्यवसायात अपेक्षित सहकार्य लाभेल. मातुल घरा कडून चांगली बातमी कळेल. खर्च वाढेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

मीन - चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील. मनात एखादी अनामिक भीती निर्माण होईल. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी सुद्धा अनुकूल आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details