मेष -आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आपल्या कृती संयमित ठेवणे हितावह राहील. राग, द्वेष यांपासून दूर राहावे लागेल. शत्रूंचा उपद्रव वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ विद्येत आवड निर्माण होईल.
वृषभ -आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. व्यापार - व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. दुपार नंतर चांगले मनोरंजन होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल. वस्त्र व गृहोपयोगी वस्तू ह्यांच्या खरेदीवर खर्च होईल. सामाजिक मान- सम्मान होतील.
मिथुन -आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील. संतती विषयक काळजी निर्माण होईल. दुपार नंतर घरातील वातावरण शांत असल्याने मानसिक दृष्टया आपणास ताजेतवाने वाटेल. व्यवसायात सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. आर्थिक लाभ होतील. कामात यशस्वी व्हाल.
कर्क -आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. शक्यतो आज प्रवास टाळावेत. स्थावर संपत्तीचा व्यवहार न करणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात विचारांचे वादळ उठेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होऊन शारीरिक प्रसन्नता जाणवेल. नव्या कामात अडथळे येतील.
सिंह -आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपार नंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार आज टाळणे हितावह राहील. आईच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
कन्या - आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. दुपार नंतर मात्र अनुकूल वातावरण निर्माण होईल. भावंडांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकाल. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. नशिबाची साथ लाभेल.