महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

8 नोव्हेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांच्या हातून एखादे परोपकाराचे कार्य घडेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - 8 november horoscope

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

horoscope
राशीभविष्य

By

Published : Nov 8, 2021, 12:05 AM IST

मेष - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल. मानसिक व्यग्रता व मनाची बेचैनी ह्यामुळे आपले कामात लक्ष लागणार नाही. प्रकृती नरमच राहील. एखाद्या मंगल प्रसंगी हजर राहण्याचे आमंत्रण मिळेल.

वृषभ - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. शारीरिक दृष्टया अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळण्यास उशीर होईल व त्यामुळे निराश व्हाल. आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील. प्रवासात विघ्ने येतील. एखाद्या कामाच्या मागे लागून सुख शांती गमावून बसण्याची शक्यता आहे.

मिथुन - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मनोरंजन व आनंद - प्रमाद करण्याचा आहे. मित्र व कुटुंबीयांसह आनंदी वातावरणात दिवस घालवाल. सामाजिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल. दांपत्य जीवनाचे सौख्य उपभोगू शकाल.

कर्क - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी व यशदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ जाईल. महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील.

सिंह - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल. संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. मित्रांचा सहवास आनंद देईल. हातून एखादे परोपकाराचे कार्य घडेल.

कन्या -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी पटणार नाही व त्यामुळे घरात शांतता नांदणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. पाण्या पासून भीती आहे. सबब जलाशयाच्या ठिकाणी दुस्साहस करू नका. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधीच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा.

तूळ - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज नशिबाची साथ लाभेल. भावंडांशी सौहार्दतेचे संबंध राहतील. एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. परदेशातून आनंददायी बातम्या येतील. हितशत्रूंवर मात करू शकाल. सन्मान प्राप्ती होईल.

वृश्चिक - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी गैरसमज होणाची शक्यता आहे. मनात येणारे नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. अनावश्यक खर्च उदभवू नयेत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य आपणास बेचैन करेल

धनु - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नियोजित कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. प्रवास संभवतात. नातेवाइकां कडील एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. स्वकीयांना भेटून आनंद होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. आजचा आपला व्यवहार सामान्य राहील. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. सामाजिक क्षेत्रात यश व कीर्ती लाभ होईल.

मकर - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल व त्यात खर्चही होऊ शकतो. आरोग्य विषयक चिंता राहील. संतती व नातेवाईक ह्यांच्याशी मतभेद संभवतात. यश कष्टप्रदच होईल. मन व्याकूळ होईल. एखादा अपघात संभवतो.

कुंभ - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती होईल. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. रमणीय स्थळी पर्यटनासाठी जाण्याचा बेत ठरवाल. समाजात प्रसिद्धी मिळेल. संततीची प्रगती होईल. पत्नी व संतती कडून आनंदाची बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

मीन - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामातील यश व वरिष्ठ अधिकार्‍यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. येणी वसूल होतील. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. घरात सुख शांती नांदेल. प्रगती संभवते. सरकारकडून लाभ होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details