महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

8 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - astrological prediction horoscope for the day 7 august

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

check astrological prediction for your sign
8 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

By

Published : Aug 8, 2021, 12:01 AM IST

मेष -आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल. आईचे स्वास्थ्य खराब असेल. वाहन चालविताना सावधानी बाळगा. आज महत्वाचा व्यवहार करू नका. कार्यालय किंवा अन्य ठिकाणी स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकते. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.

वृषभ -आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल. हळवेपणा व काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला व साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांकडे चांगले लक्ष राहील. मित्रांसह प्रवास ठरवाल. आर्थिक गोष्टी पूर्ण होतील. आवडीचे भोजन मिळेल. नशिबाची साथ लाभेल.

मिथुन -आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. नोकरी - व्यवसायात बरोबरचे कार्यकर्ते किंवा सहकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.

कर्क -आज आपणास शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. मित्र व स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल. आपले मन अगदी संयमी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. प्रवासाची व आर्थिक लाभाची शक्यता आहे.

सिंह -आज जास्त चिंतातुर व भावनाशील राहिल्याने आपणास शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वाद - विवादामुळे भांडण निर्माण होईल. कोर्ट - कचेरी प्रकरणात सावध राहावे. उक्ती व कृती यात संयम राखणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या मानाने खर्च अधिक होईल. कोणाचे गैरसमज होऊ नयेत याची काळजी घ्या.

कन्या -आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे. व्यापार - व्यवसायाच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख - शांती लाभेल. पत्नी, संतती, वडीलधारी यांचेकडून लाभ होईल. मित्रांसोबत रम्य पर्यटन कराल. स्त्री मित्र विशेष सहायक ठरतील. संतती कडून चांगल्या बातम्या मिळतील.

तूळ -आज घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आईकडून लाभ होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कामाची स्तुती होऊन प्रेरणा सुद्धा मिळेल. सहकारी सहकार्य करतील. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.

वृश्चिक -आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा व आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. मनात गाढ चिंता सतत येत राहतील. नोकरी - व्यवसायात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी वादविवाद टाळा. परदेश गमनाच्या संधी येतील. परदेशात वास्तव्यास असणार्‍या नातलगां कडून आनंददायी बातम्या मिळतील. संततीविषयक चिंता राहील.

धनू -आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. निषेधार्ह व अवैध कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा.

मकर -विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धन लाभ संभवतो. संततीच्या अभ्यासा विषयी चिंता निर्माण होईल. कामात यश मिळेल. विचार अस्थिर व द्विधा मनःस्थिती होईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. तब्बेत उत्तम राहील. वाहन सौख्य व सन्मान प्राप्ती होईल. नववस्त्रांची खरेदी होईल. एखादा मनोरंजक प्रवास घडेल.

कुंभ- आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती व सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.आपले विचार व व्यवहार यांत हळवेपणा राहील. नोकरीत सहकारी सहकार्य करतील. नोकराकडून व मातुल घराण्याकडून लाभ होईल. कामासाठी पैसा खर्च होईल. विरोधक व प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.

मीन -आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेमालाप होईल. शेअर - सट्टा बाजारात लाभ होईल. मानसिक समतोल मात्र राखावा लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details