महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

7 February Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांसाठी आजचा दिवस खर्चाचा आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - महाराष्ट्राचे राशिभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

Horoscope 7 February Maharashtra
Horoscope 7 February Maharashtra

By

Published : Feb 7, 2022, 12:01 AM IST

मेष -आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरवात आपण स्फूर्तीने व उत्साहाने कराल. मित्र व सगे सोयरे यांच्या येण्या जाण्याने घरातील वातावरण आनंदाचे राहील. त्यांची अचानक भेट आपणास आनंदित करेल. आज आर्थिक फायदा होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवा. नवीन कामे सुरू करू शकाल. उत्तम भोजनाचा लाभ मिळेल.

वृषभ - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब असल्यामुळे मन उदास बनेल. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याने आपले मन दुःखी होईल. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे नाराज व्हाल. दिवस खर्चाचा आहे.

मिथुन - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. मित्रां कडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. एखाद्या सुंदर जागी पर्यटनासाठी गेल्याने संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल. विवाहेच्छुकांना विवाह ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पत्नी व संतती ह्यांच्याशी सुसंवाद राहिल्याने दांपत्य जीवनात गोडवा निर्माण होईल.

कर्क - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील. नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आई कडून लाभ होईल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. धन व प्रसिद्धी वाढेल.

सिंह - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस आळस व थकवा ह्यात जाईल. आपल्या तापॅट स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. नकारात्मक विचार, वर्तन व नियोजन ह्या पासून दूर राहावे. एखादा प्रवास संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कन्या - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. अती उत्साह व क्रोधाचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर ताण येण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. एखादा प्रवास संभवतो. सरकार विरोधी कृतीमुळे समस्या निर्माण होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्‍या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसह बाहेर जावे लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापारी वर्गाला व्यापारात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ संभवतो.

वृश्चिक - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपण निश्चिंतपणा व सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्याने अनेक कामे हाता वेगळी कराल. अपूर्ण कामे तडीस जातील. आर्थिक लाभामुळे खर्च आपला ताण वाढविणार नाही.

धनू -आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून, प्रवासात त्रास संभवतो. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्यांची काळजी राहील. कामे अपूर्ण राहिल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कला व साहित्याकडे मनाचा कल होऊन विविध कल्पना सुचतील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बौद्धिक चर्चे पासून दूर राहणे हितावह राहील. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस अनुकूलतेचा आहे.

मकर - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपली मनःस्थिती व आरोग्य चांगले राहणार नाही. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. छाती संबंधी आजार होऊ शकतो. झोप येणार नाही. मानहानी होऊ शकते. एखादा अपघात संभवतो. मानसिक उद्वेग व एकंदरीत प्रतिकूलता ह्यामुळे दिवस चिंतातुर अवस्थेत जाईल.

कुंभ - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. चिंता दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. भावंडे व स्नेही ह्यांच्याशी वैचारिक एकोपा निर्माण होईल. एखादी महत्वपूर्ण योजना आखाल. जवळपास प्रवासाला जाण्याचा बेत ठरवू शकाल.

मीन -आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. वाद व संघर्ष टाळण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावे लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details