महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

7 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज नोकरीत बढती मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - 7 डिसेंबर राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

राशीभविष्य
राशीभविष्य

By

Published : Dec 7, 2021, 12:02 AM IST

मेष -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रकृती नरम गरमच राहील. मात्र, हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आज व्यावसायिक कामा निमित्त प्रवास करावा लागेल. इतरांना मदत करण्याचा आपण प्रयत्न कराल.

वृषभ -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणाने काळजी वाटेल. उक्ती आणि कृती ह्यात संतुलन ठेवावे लागेल. व्यवसायात अडचणी उदभवतील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांची नाराजगी ओढवून घ्यावी लागेल. संतती विषयक काळजी निर्माण होईल.

मिथुन -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपली मनःस्थिती मनोरंजनात्मक कार्यात सहभागी होण्याची असल्याने मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. रुचकर भोजन व उंची वस्त्रालंकार लाभतील. दुपारनंतर आपण जास्त हळवे व्हाल व त्यामुळे मनातील दुःख वाढेल. आर्थिक खर्चात वाढ होईल. अवैध कार्यापासून दूर राहा. मनाला शांती मिळू शकेल अशा एखाद्या प्रवृत्तीत सहभागी व्हा.

कर्क -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. बौद्धिक चर्चेत तार्किक विचारांचा वापर करायला आजचा दिवस अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होईल. भागीदारांकडून लाभ होतील.

सिंह -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपारनंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील व त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

कन्या -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. कार्य साफल्य न झाल्याने निराश व्हाल. संतती विषयक चिंता सतावेल. शक्यतो प्रवास टाळा.

तूळ -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपार नंतर मात्र मन उदास होईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण क्लेशकारक राहील. स्थावर संपत्ती विषयक कागदपत्रा बद्दल सावध राहावे लागेल. आईची तब्बेत बिघडू शकते.

वृश्चिक -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. नियोजित काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपारनंतर भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. प्रवास घडतील. गूढ विषयांचे आकर्षण होईल.

धनू - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. प्रवास संभवतो. दुपार नंतर मात्र द्विधा मनःस्थिती होईल. घरात व कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. वायफळ खर्च होतील.

मकर - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपल्या बोलण्या वागण्याने भांडण होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर स्फूर्ती व उत्साह वाढेल. घरातील वातावरण शांत व आनंददायी होईल. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होऊ शकाल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.

कुंभ -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. दुपार नंतर मात्र घरातील वातावरण कलुषित होईल. शरीर स्वास्थ्य बिघडेल. आपला संताप संयमित ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मीन -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. हातून परोपकारी कार्य घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. वडील व वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळून त्यांच्याकडून लाभ होईल. उत्पन्नात वाढ होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details