मेष -चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज मनाची एकाग्रता कमी झाल्याने मनास दुःख होईल. मानसिक ताण जाणवेल. गुंवणूकीतून फारसा लाभ होणार नसल्याने आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. महत्वाच्या कागदपत्रांच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागेल. दुपार नंतर कामाचा प्रारंभ सहजपणे होईल. कौटुंबिक वातावरणात सुधारणा होईल. धार्मिक कार्ये घडतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल.
वृषभ - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिने शुभ फलदायी आहे. मित्र व वडीलधार्यांचा सहवास लाभेल. नवे मित्र होतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. प्रवास संभवतात. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आप्तांवर खर्च होईल. त्यांच्याशी मतभेद सुद्धा होतील. धार्मिक कार्यांवर खर्च होईल. स्वभाव उदासीन होईल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. आध्यात्मिक बाबींमध्ये सक्रीय होऊन त्यात आनंद मिळवू शकाल.
मिथुन - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन झाल्याने आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील व वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. दुपार नंतर मित्रांकडून लाभ होईल. एखाद्या सामाजिक कार्यास हजेरी लावाल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
कर्क - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज वरिष्ठांशी वाद होण्याच्या शक्यतेमुळे उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपार नंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामामुळे संतुष्ट राहतील. आर्थिक दृष्टया लाभ होईल.
सिंह - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने संताप व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता आहे. मानसिक व्यग्रता राहील. कुटुंबियांशी भांडणे होतील. शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. वरिष्ठ व प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वादविवाद करू नका. नकारात्मक विचारां पासून दूर राहा.
कन्या -चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. सामाजिक मान - सन्मान होतील. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. करमणुकीमुळे दिवस आनंदात जाईल. व्यापारी येणी वसूल होतील. दुपार नंतर प्रकृती नरम गरम होईल. अचानक लाभ संभवतात.