मेष -धनु राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. एखाद्या मंगल प्रसंगात सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी व कुटुंबात मतभेद होतील.
वृषभ - धनु राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज कार्यपूर्तीस होणारा विलंब व शारीरिक अस्वास्थ्य ह्यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. आज नवे काम सुरू करू नये. आपल्या खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
मिथुन -धनु राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आज आपण मौज - मजा व मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी व प्रिय व्यक्तीसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामाजिक जीवनात मान - सन्मानाचे धनी बनाल. हातून दान - धर्म व विधायक कामे होतील.
कर्क -धनु राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आजचा दिवस खुशीचा व यशाचा आहे. कुटुंबात सुख - शांती व समाधान राहील. नोकरदारांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. नोकर वर्गाकडून व मातुल घराण्याकडून लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. आवश्यक खर्च होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
सिंह -धनु राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल. साहित्य व कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. परोपकाराचे कार्य कराल. मनाला आनंद वाटेल.
कन्या - धनु राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आज आपणास प्रतिकूलतेस तोंड देण्यास तयार राहावे लागेल. आरोग्य विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी खटका उडेल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. अभ्यासाच्या दृष्टीने काळ चांगला नाही. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधित समस्या उदभवतील.