मेष -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आजचा दिवस आगळा-वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ व रहस्यमय विद्येची गोडी वाटेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस नवीन कामाचा आरंभ करण्यास अनुकूल नाही. प्रवासात अचानक संकटे येतील. क्रोध व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
वृषभ - आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रां कडून आनंददायी बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. व्यापार्यांना व्यापारात वृद्धी होईल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत यश व प्रतिष्ठा मिळेल.
मिथुन - आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. स्वास्थ्य उत्तम राहील. कामात यश व कीर्ती लाभेल. इतरांशी बोलताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवून मितभाषी राहिल्यास मतभेदाचे प्रसंग उदभवणार नाहीत. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच खर्च कराल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नोकरीत लाभ होतील.
कर्क - आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उद्विग्नता राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमीजनांत वाद - विवाद होऊन रुसवे- फुगवे होतील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण आपणास अडचणीत टाकेल. नवीन कार्यारंभ अथवा प्रवास न करणे हितावह राहील.
सिंह -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. जलाशय धोकादायक ठरू शकतात. नोकरीत स्त्री वर्गा पासून जपून राहा.
कन्या -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भावंडांशी संबंधात सौहार्द राहील. मित्र व स्नेह्यांशी संवाद साधू शकाल. गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. एखाद्या विषयात प्रावीण्य प्राप्त होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.