महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

31 March Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज व्यवसायात हानी संभवते; जाणून घ्या, आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

By

Published : Mar 31, 2022, 12:03 AM IST

मेष - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. परोपकारात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल. सबब सांभाळून राहा. मानसिक बेचैनी राहील. मांगलिक व सामाजिक कार्यावर पैसा खर्च करावा लागेल.

वृषभ -आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात व व्यापार - व्यवसायात वाढ होईल. व्यापारात ओळख व संपर्क यांमुळे लाभ होईल. संतती व पत्नी यांच्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. दांपत्यसुख उत्तम मिळेल.

मिथुन - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. संतती कडून लाभ होऊ शकतो. उत्तम भोजन मिळेल. संतती कडून एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरी - व्यवसायात प्राप्ती वाढेल.

कर्क -आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आरोग्य उत्तम राहील. मन पण चिंतामुक्त होईल. अचानक धनलाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल.

सिंह -आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्याने आपले मन अशांत होईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आज व्यवसायात अडथळा येईल. परदेशातील आप्तांकडून खुषालीची बातमी मिळेल.

कन्या -आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळावे लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खूप खर्च होईल. पाण्या पासून जपून राहावे लागेल. सरकार विरोधी कृत्ये, भांडणे ह्यापासून शक्य तितके दूर राहावे.

तूळ -आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. तसेच वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. शरीर व मन तंदुरुस्त राहील. लोकांमध्ये मान - सन्मान मिळेल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

वृश्चिक - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आरोग्य विषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर - सट्टा यात न पडणे हिताचे राहील. शक्यतो प्रवासात जपून राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आर्थिक नियोजन यशस्वीरीत्या पूर्ण कराल.

धनू -आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शरीर व मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या प्रकृती संबंधी चिंता राहील. सार्वजनिक दृष्टया आपला मानभंग होऊ नये याकडे लक्ष द्या. वेळेवर जेवण व झोप न मिळाल्यामुळे स्वभाव चिडचिडा होईल. महत्वाची खरेदीपत्रे करू नका.

मकर -आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नवीन काम हाती घेण्यास दिवस अनुकूल आहे.

कुंभ - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद - विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. कामात अल्प यश मिळेल. समाधानाची भावना अनुभवाल. पण आरोग्य बिघडेल. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्तीत अडचणी येतील. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.

मीन -आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज कोणाशीही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज आर्थिक देवाण - घेवाण सावधपणे करावी लागेल. आप्त स्वकीयांशी वाद होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारणच राहील. मनात नकारात्मक विचार येतील.

ABOUT THE AUTHOR

...view details