मेष -आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल आहे. तसेच आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. शारीरिक व मानसिक उत्साहाचा अनुभव होईल. मित्र - स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. तसेच त्यांच्यासह एखादा समारंभ किंवा सहलीस जाऊ शकाल.
वृषभ -आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज वैचारिक पातळीवर थोरपणा व गोड वाणी ह्यामुळे इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल. बैठका, चर्चा ह्यात सुद्धा आपणाला यश मिळेल. कष्टाचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल. पचनसंस्थे संबंधी तक्रारी वाढून त्रास होईल. शक्यतो घरच्या खाण्याला प्राधान्य द्या. अभ्यासात गोडी वाढेल.
मिथुन - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज मनाची स्थिती दोलायमान राहील. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आई विषयी अधिक भावनाशील व्हाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत. कौटुंबिक व स्थावर संपत्ती विषयी शक्यतो चर्चा टाळावी. स्वकीय व स्नेही यांच्याशी ताण - तणाव संभवतात. शक्यतो प्रवास टाळा.
कर्क -आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरण सुद्धा आनंदी असेल. मित्र व स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रां कडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रियव्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदीत राहाल. आर्थिक लाभ होऊ शकेल. लहान सहलीस जाऊ शकाल. मान - सन्मान वाढेल.
सिंह - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस कुटुंबियांसह सुख शांतीत घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश जरा कमीच मिळेल.
कन्या -आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी असेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साही व प्रसन्न राहाल. आर्थिक लाभ होतील. मित्र व स्नेह्यांची भेट आनददायी राहील. प्रवास आनंददायी होईल.