महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

3 सप्टेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज संतती विषयक प्रश्न भेडसावतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

राशीभविष्य
राशीभविष्य

By

Published : Sep 2, 2021, 10:03 PM IST

Updated : Sep 3, 2021, 12:32 AM IST

मेष -आज अती विचाराने मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद - विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. एखादा मानहानीचा प्रसंग उदभवेल. नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी येतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल.

वृषभ -सुरुवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

मिथुन - आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपारनंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचे वाटेल. आर्थिक देवाण - घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल.

कर्क -आजचा दिवस प्राप्तीच्या प्रमाणात अधिक खर्च करण्याचा आहे. नेत्र विकार बळावतील. मानसिक चिंता वाढतील. कोणाशी वाद होऊ नयेत म्हणून आपल्या कृतींवर संयम ठेवा. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. आर्थिक लाभ संभवतात. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

सिंह - आजची सकाळची वेळ फारच चांगली आहे. सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक बातम्या प्राप्त होतील. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल. दुपार नंतर आपल्या बोलण्यामुळे काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे.

कन्या - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. कुटुंबियांशी सलोखा राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. त्यामुळे आपण आनंददित व्हाल. दुपार नंतर आपली उक्ती आणि कृती यांमुळे काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो.

तूळ -आज सकाळी आपले मन चिंतातुर होईल. शारीरिक दृष्टया शैथिल्य व आळस वाढेल. नोकरीत वरिष्ठ नाराज होतील. संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. वरिष्ठांची मर्जी संपादन केल्याने पदोन्नती मिळविण्याचा आपला मार्ग सुकर होईल. सामाजिक क्षेत्रातही मान- सन्मानाचे प्रसंग येतील. प्रकृती उत्तम राहील.

वृश्चिक - आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हातून एखादे अवैध कार्य होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आपले बोलणे संयमित ठेवल्यास परिस्थिती आपणास अनुकूल होऊ शकेल. पोटदुखीच्या विकाराने त्रस्त व्हाल. व्यावसायिक क्षेत्रात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. व्यापार - व्यवसायात प्रतिकूलता जाणवेल.

धनू -आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सकाळी मनोरंजनात्मक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपार नंतर मात्र मनात नकारात्मक विचारांचे वादळ निर्माण होईल. व त्यामुळे मन दुःखी होईल. रागाचे प्रमाण वाढेल. कुटुंबीय व सहकार्यांशी वाद संभवतात.

मकर -आज आपणास आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. सामाजिक मान- सन्मान संभवतात. आर्थिक लाभ होतील. दुपार नंतर स्वकीय व मित्र यांच्या सहवासात आनंदित होऊ शकाल. वाहनसौख्य मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदित व्हाल.

कुंभ -आज आपल्यात कलेविषयी विशेष गोडी निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. दुपार नंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आर्थिक लाभ होतील. व्यापार -व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वाणीवर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल.

मीन -आज आपण अती भावनाशील व्हाल. अती विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा टाळणे हितावह राहील. अपचन व पोटाच्या तक्रारी यामुळे शारीरिक अस्वस्थता जाणवेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते.

Last Updated : Sep 3, 2021, 12:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details