महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

29 ऑक्टोबर राशीभविष्य : कर्क राशीवाल्यांना आज आर्थिक लाभ मिळतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - 29 october horoscope

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

आजचे राशीफळ
आजचे राशीफळ

By

Published : Oct 29, 2021, 12:01 AM IST

मेष -आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज आपला स्वभाव हळवा झाल्याने कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारामुळे आपल्या भावना दुखावतील. आईच्या प्रकृतीमुळे आपण खूप चिंतित व्हाल. आपला स्वाभिमान सुद्धा दुखावला जाऊ शकतो. आपणाला थकवा जाणवेल, जेवण व झोप ह्यात अनियमितता येईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहा. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. मनःशांतीसाठी प्रयत्न करावे लागतील. स्थावर मालमत्ते विषयी चर्चा टाळणे हितावह राहील.

वृषभ -आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल. आज आपण भावुक व संवेदनशील झाल्याने कल्पनाशक्ती व सृजनशक्ती डोके वर काढतील. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र ह्यात आज आपण काम करू शकाल. कुटुंबियांशी विशेषतः मातेशी सुसंवाद घडेल. छोटा प्रवास संभवतो. आर्थिक गोष्टींकडे लक्ष देऊ शकाल. आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल.

मिथुन -आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज सुरवातीच्या त्रासा नंतर आपण ठरवलेली कामे पार पडतील व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे आपले कीती तरी त्रास कमी होऊ लागतील. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने तेथील वातावरण चांगले राहील. मित्र किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदात भर पडेल. कुटुंबात शांती व आनंदाचे वातावरण राहील.

कर्क -आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस मित्र परिवार व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात चांगला जाईल. त्यांच्या कडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल. तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. काही शुभ समाचार व आर्थिक लाभ सुद्धा मिळतील. पत्नीच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आज शारीरिक व मानसिक आनंदाचा उपभोग घेऊ शकाल.

सिंह - आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज कोर्ट - कचेरीच्या प्रश्नात सावध राहावे लागेल. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अवैध कृत्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. विदेशातून एखादी आनंददायी बातमी येईल. कायदेशीर गोष्टींचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा.

कन्या - आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल. दांपत्य जीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्ती साठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यापारातील पैसे मिळविण्यासाठी प्रवास करावा लागेल. अविवाहितांना जोडीदाराच्या शोध मोहीमेत यश मिळेल.

तूळ -आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज आपणाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मनात भावनात्मकता वाढेल. मातुल घराण्याकडून फायदा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जमीन व मालमत्तेचे व्यवहार यशस्वीपणे करू शकाल. आजचा दिवस व्यवसायात यश प्राप्तीचा आहे.

वृश्चिक - आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. लेखन - साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. संततीशी मतभेद होतील. प्रवासाची शक्यता आहे. पैसा खर्च होईल.

धनू -आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आपणास खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामात यश मिळण्यास विलंब झाल्याने नैराश्य येईल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये. प्रकृती भिघडण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्यावर संयम ठेवाव लागेल. खर्चात वाढ होईल.

मकर - आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. त्यामुळे आर्थिक स्तर मजबूत होईल. मान, प्रतिष्ठा वाढेल. एखादा प्रवास संभवतो.

कुंभ -आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळाल्याने प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. स्त्रीयांना माहेरहून अनेक चांगल्या बातम्या मिळतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत सुद्धा सहकारी उत्तम सहकार्य करतील. शरीर व मन प्रसन्न राहील. कौटुंबिक वातावरण सुख - शांतीचे राहील.

मीन - आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूलतेचा आहे. अभ्यासात यश व प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. प्रेमीजनांना परस्परांचा सहवास लाभेल. आपल्या स्वभावात जास्त हळवेपणा राहील. स्त्री स्नेह्यांसाठी खर्च होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details