मेष -आजच्या दिवसाचा प्रारंभ स्फूर्ती व उत्साहाने होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर मात्र आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र व आप्तेष्टांची भेट होईल. दुपार नंतर कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. इतरांशी बोलताना वाणी संयमित ठेवावी. कुटुंब, आप्तेष्ट व कामाच्या ठिकाणी संबंधातील सौहार्दता टिकून राहण्यासाठी स्फूर्ती व उत्साह ह्यात संतुलन ठेवावे लागेल.
वृषभ -द्विधा मनःस्थितीमुळे आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल. स्वकीयांशी दुरावा संभवतो. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. कामाचा उत्साह येईल. आर्थिक लाभ होतील. आप्तेष्टांचा सहवास घडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरगुती वातावरण आनंदी राहील.
मिथुन -आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवाचे व सहलीचे नियोजन करू शकाल. सरकारी कामातून फायदा होईल. दुपार नंतर थोडे सावध राहावयास लागेल. इतरांच्या भानगडीत पडू नका. शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावेत.
कर्क -आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. आपला संताप वाढेल. दुपार नंतर मात्र शारीरिक उत्साह व मानसिक खंबीरता ह्यामुळे थोडाफार आनंद मिळवू शकाल. कुटुंबियांशी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकाल. घराचे नूतनीकरण करण्यात आपण स्वारस्य दाखवाल व त्या दिशेने काही पाऊल उचलाल.
सिंह -आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी होईल. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकाल. कुटुंबियांशी सुद्धा महत्त्वाच्या विषयावर विचार - विनिमय करू शकाल.
कन्या -आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील. एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवू शकाल. प्रकृतीच्या कटकटींमुळे हैराण व्हाल, व त्यामुळे आपला संताप वाढेल. मात्र , त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या कामावर होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या संतापामुळे कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. एखाद्या धार्मिक समारंभात सहभागी व्हाल.