मेष -आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती होईल व त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी - व्यवसायात स्पर्धेचा राहील व त्यात यशस्वी होण्याचा आपण प्रयत्न कराल. एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस लेखन कार्यास अनुकूल आहे. बौद्धिक व तार्किक विचार - विनिमय करण्यास संधी मिळेल.
वृषभ - आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज द्विधा मनःस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आज लेखक, कारागीर व कलाकारांना आपली प्रतिभा व्यक्त करण्याची संधी मिळेल. आपल्या सुमधुर वाणीने एखाद्याची समजूत घालू शकाल. अनुकूल स्थिती नसताना नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील.
मिथुन - आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर व मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आर्थिक लाभाची संधी आहे. मनात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना थारा न देणे किंवा ते दूर करणे हितावह राहील. कोणत्याही परिस्थितीत मन संयमित ठेवा.
कर्क - आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. संबंधित व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल. वाणी वर संयम ठेवावा लागेल. मनातील साशंकता दूर करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
सिंह -आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. मित्रांकडून व विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. मनःस्थिती चांगली नसल्याने महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नये. संततीशी चर्चा होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ मिळेल.
कन्या -आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने पदोन्नतीची संधी मिळेल. पितृघराण्या कडून फायदा होईल. स्वास्थ्य चांगले राहील. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. पत्नीसह चांगला वेळ घालवाल. व्यावसायिक कामासाठी बाहेर जावे लागेल.