मेष -आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास सांसारिक बाबींचा विसर पडेल. गूढ, रहस्यमय विद्या ह्याची गोडी लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रूंचा त्रास होईल. आज शक्यतो नवीन कार्य सुरू करू नका.
वृषभ - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास वैवाहिक जवळीक साधता येईल. कुटुंबीयांसह सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे झाल्याने वेळ आनंदात जाईल. शरीर व मनाला प्रसन्नता वाटेल. सार्वजनिक जीवनात यश व कीर्ती मिळेल. व्यापारी आपल्या व्यापारात विकास करू शकतील. भागीदारीत लाभ होईल. अचानक धनलाभ होईल. विदेशातून बातम्या मिळतील.
मिथुन -आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांततेचे व आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो कारणी लागेल. आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील. कामात यश मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. खोळंबलेली कामे पूर्ण होतील. संतापाचे प्रमाण मात्र वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
कर्क -आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरूवात चिंता व उद्वेगाने होईल. आरोग्याच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. अचानक धन खर्च होईल. प्रेमीजनांत वाद - विवाद होऊन मतभेद किंवा बोलाचाली होईल. एखादी मानहानी संभवते. प्रवासात अडचणी येतील.
सिंह - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई - वडिलांशी मतभेद होतील. त्यांची प्रकृती बिघडेल. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा. जलाशया पासून जपा. भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका.
कन्या - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. समाजात मान - सन्मान मिळेल. चित्तवृत्ती प्रफुल्लित राहील.