महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

27 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य -

astrological prediction
astrological prediction

By

Published : Aug 27, 2021, 12:02 AM IST

मेष - आज आपले प्रत्येक काम उत्साह व आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. शरीर व मन स्फूर्ती आणी टवटवीतपणाने भरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्र व स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. आई कडून लाभ होईल. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ, रुचकर भोजन व भेटवस्तू मिळाल्याने आपला आनंद वाढेल.

वृषभ -आज क्रोध व निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. घर-परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल. गैरसमजा पासून जपून राहावे.

मिथून -आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी-व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात माधुर्याचा आनंद घ्याल. संतती कडून आनंददायी बातम्या मिळतील.

कर्क - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढती संभवते. वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. कुटुंबियासह मनमोकळ्या गप्पा मारू शकाल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कामासाठी प्रवास होतील. मातेशी संबंधात सौहार्दता राहील. सरकारी लाभ होतील. प्रकृती उत्तम राहील.

सिंह -आजचा दवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आपल्या हातून योग्य तोच व्यवहार घडेल. आज मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. काही कारणाने आपला संताप वाढेल. परदेशात राहणार्‍या नातेवाईकां कडून एखादी चांगली बातमी मिळेल. संतती संबंधित व व्यावसायिक कटकटींमुळे आजचा दिवस अशांततेत जाईल.

कन्या -आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्यास अनुकूल आहे. मात्र, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे पदार्थ खाण्या - पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. खर्च वाढतील. सरकार विरोधी कृत्यापासून दूर रहा. वादा पासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा.

तूळ -आजचा दिवस आनंददायी आहे. प्रिय व्यक्तीसह प्रेमालाप होऊ शकेल. मित्रासह केलेल्या प्रवासातून आनंद मिळेल. नवीन वस्त्रालंकाराची खरेदी होऊ शकेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मान-सम्मान होतील. रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल. वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल.

वृश्चिक -आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या भेटी रद्द झाल्याने निराश व क्रोधीत व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. मातुला कडून एखादी अप्रिय बातमी मिळाल्याने मन व्यथित होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. प्राप्ती कमी व खर्च जास्त अशी स्थिती राहील. शक्यतो आज नवीन कामाची सुरूवात करू नका.

धनू -आज कार्यपूर्ती न झाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतती विषयक बाबींमुळे चिंता वाढतील. शक्यतो आज प्रवास टाळावेत.

मकर -आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्याने मनाची बेचैनी वाढेल. भोजन अवेळी होऊ शकते. शांत झोप मिळणार नाही. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. जलाशया पासून सावध राहावे लागेल. एखादी धनहानी व मानहानी संभवते.

कुंभ -आज आपणास मनाने हलके वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांसह काही आयोजन कराल. त्यांच्यासह वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. जवळच्या ठिकाणी सहलीसाठी जाऊ शकाल. विरोधकांवर मात करू शकाल. नशिबाची साथ लाभेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.

मीन -आज आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर व वाणीवर सुद्धा ताबा ठेवावा लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे लागतील. शारीरिक व मानसिक आरोग्य मध्यम राहील. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनात नकारात्मक विचार येतील. खाण्यापिण्यावर संयम ठेवावा लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details