मेष -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. शारीरिक व मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह एखाद्या स्नेहसंमेलनास जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र काही कारणास्तव आपली प्रकृती नरम गरम होईल.
वृषभ - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. द्विधा मनःस्थितीमुळे आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल. स्वकीयांशी दुरावा संभवतो. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल.
मिथुन - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवाचे व सहलीचे नियोजन करू शकाल. सरकारी कामातून फायदा होईल.
कर्क -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. आपला संताप वाढेल. दुपार नंतर मात्र शारीरिक उत्साह व मानसिक खंबीरता ह्यामुळे थोडाफार आनंद मिळवू शकाल.
सिंह -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल.
कन्या -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील. एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवू शकाल. प्रकृतीच्या कटकटींमुळे हैराण व्हाल, व त्यामुळे आपला संताप वाढेल.